[ad_1]

नवी दिल्ली : जगभरात कुठेही मालमत्तेत (प्रॉपर्टी) गुंतवणूक करणे फायदेशीर पर्याय मानला जातो. मालमत्तेच्या किंमती सामान्यतः नियमितप्रमाणे वाढतात. होय, काहीकाळ मालमत्तेच्या किमती स्थिर राहतात. तसेच लोकं बंद डोळ्यांनी घर, दुकान किंवा फ्लॅट खरेदी करतात आणि नफ्याची अपेक्षा करतात असं नाही. सध्या गुढीपाडव्याचा सण तोंडावर आला आहे आणि या शुभ मुहूर्तावर मालमत्तेत गुंतवणूक करून तुम्हालापण कमाई करायची असेल तर घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा.बहुतांश लोक गुंतवणूक करण्यासाठी निवासी किंवा व्यावसायिक मालमत्ता खरेदी करत आहात तर काही मूलभूत नियमांचे पालन करावे लागेल. परंतु तुम्ही योग्य तपास न करता मालमत्ता खरेदी केली तर तुमचे पैसे तर अडकतील पण तीच मालमत्ता तुमच्या गळ्याचा फास बनेल.
Home Buying: सेकंड होम घ्यायचा विचार करताय? किती फायदा, नुकसान काय, आधी जाणून घ्या…
चांगल्या ठिकाणी मालमत्ता खरेदी करा

घर असो, दुकान किंवा प्लॉट ठिकाण योग्य असेल तरच त्याची मागणी आणि किंमत काळानुरूप वाढतते. म्हणूनच नेहमी चांगल्या ठिकाणीच मालमत्ता खरेदीचा निर्णय घ्या आणि झोपडपट्टीच्या जवळ खरेदी करणे टाळा. तसेच रुग्णालय, शाळा आणि बाजार यासारखी महत्त्वाची क्षेत्रे यापासून वाजवी अंतरावर आहेत याचीही खात्री करा. कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी स्थानिक रिअल इस्टेट बाजारातील ट्रेंड म्हणजे बाजारात तेजी आहे की मंदी हे जाणून घेतल्यानंतरच कोणताही निर्णय घ्या.

मूलभूत सुविधा आवश्यक
तुम्ही ज्या ठिकाणी मालमत्ता खरेदी करत आहात त्या ठिकाणी पाणी, वीज आणि सांडपाणी यांसाख्या गरजेच्या सुविधांची नक्की माहिती करून घ्या. तसेच तुमची मुलं किंवा घरातील ज्येष्ठांसाठी बाग किंवा उद्यान, शॉपिंग स्टेंटर, शाळा आणि हॉस्पिटलच्या सुविधांचीही माहिती घ्या ज्या तुमच्या मालमत्तेचे मूल्य वाढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
बिल्डरच्या दिरंगाईचा खरेदीदारांना फटका; पैसे देऊनही फ्लॅटचा वेळेत ताबा दिला नाही तर काय करावं?
मालमत्ता वादग्रस्त असू नये
फ्लॅट किंवा मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी त्याची कायदेशीर स्थिती तपासून घ्यावी जेणेकरून मालमत्तेचा कोणताही वाद सुरू आहे की नाही हे स्पष्ट होते. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडूनही आवश्यक परवानग्या घेणे आवश्यक असून निर्विवाद मालमत्तेची विक्री करणे सोपे असले तरी त्याची किंमतही जास्त असते.

बिल्डरच्या प्रतिष्ठेकडे पाहा
विकासकाने बांधलेल्या गृहनिर्माण संस्थेत मालमत्ता खरेदी करत असाल, तर विकासकाची प्रतिष्ठाही निश्चितपणे जाणून घ्या. नेहमी केवळ नामांकित विकासकांनी विकसित केलेल्या सोसायट्यांमध्येच मालमत्ता खरेदी करा. तसेच क्षेत्रातील पुढील विकासाच्या क्षमतेची माहिती मिळवा.
मुलाला संपत्तीतून बेदखल केल्यानंतरही या मालमत्तेत हिस्सा द्यावा लागेल, घ्या जाणून काय सांगतो कायदा
एक्झिट स्ट्रॅटेजी तयार करा

रिअल इस्टेट गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणूक असते म्हणून, तुम्ही बाहेर पडण्याची रणनीती अगोदरच बनवावी. प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी तुम्ही किती वर्षांनी प्रॉपर्टी विकायची हे ठरवावे. यासह, निर्धारित लक्ष्यापूर्वी तुम्हाला मालमत्ता विकायची असल्यास तुम्हाला होणारा संभाव्य नफा किंवा तोटा विचारात घ्या.

Read Latest Business News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *