नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा संघ सध्याच्या घडीला जोरदार चर्चेत आहे. पण दुसरीकडे मुंबई इंडियन्सने २०२३ साली संघात घेतलेला एक खेळाडू आता आरसीबीच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघाने मोठा गाजावाजा करत जोफ्रा आर्चरला आपल्या ताफ्यात स्थान दिले होते. पहिल्या वर्षी तर तो दुखापतग्रस्तच होता. त्यानंतर तो संघात आला खरा, पण त्याला आपली छाप पाडता आली नाही. आर्चर काही सामने खेळला पण त्यानंतर त्याला पुन्हा दुखापत झाली. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाने जे करोडो रुपये त्याच्यासाठी खर्च केले होते, ते पाण्यात गेले. त्यांनतर मुंबई इंडियन्सच्या संघाने एक धडा घेतला. मुंबई इंडियन्सच्या संघाने २०२३ साली आर्चरला आपल्या संघातून बाहेर केले. आर्चरच्या जागी संघात कोणाला मुंबईचा संघ घेणार, याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. पण त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाने फक्त एक गोलंदाज न घेता क्रिकेट विश्वातील एका अष्टपैलू खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले. त्यामुळे २०२३ साली मुंबई इंडियन्सच्या संघाने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस जॉर्डनला मुंबई इंडियन्सच्या संघात स्थान दिले. जॉर्डन हा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. पण त्याला मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळताना चांगली कामगिरी करता आली नाही. जॉर्डनला यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाने जास्त संधीही दिली नाही. त्यामुळे त्याच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळाले नाही. त्यामुळे जेव्हा २०२४ च्या वर्षासाठी आयपीएलचा लिलाव सुरु होणार होता, त्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाने जॉर्डनला रिलीज केले. त्यामुळे आता लिलावात त्याच्यावर कोण बोली लावतं, याची उत्सुकता सर्वांना होती. पण त्या काळाता जॉर्डन हा दुखापतग्रस्त होता आणि त्यामुळे तो खेळत नव्हता. त्यामुळे त्याच्यावर कोणीही बोली लावली नाही. पण सध्याच्या घडीला जॉर्डनने जगभरातील लीगमध्ये धडाकेबाज कामगिरी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता त्याला पुन्हा मुंबई इंडियन्स आपल्या संघात घेणार, असे वाटत होते. पण जॉर्डनला संघात घेण्यासाठी आता आरसीबीचा संघ उत्सुक असल्याचे समोर आले आहे. आरसीबीच्या संघात रील टॉपले हा खेळाडू होता, पण तो आता दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. त्यामुळे आता त्याच्या जागी आरसीबीचा संघ जॉर्डनला संघात घेत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सकडून खेळलेला हा खेळाडू आता आरसीबीच्या ताफ्यात दाखल होऊ शकतो.

रोहित शर्माला डच्चू, हार्दिक पांड्या बनला मुंबई इंडियन्सचा कर्णधार, मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?

मुंबई इंडियन्सचा संघ सध्याच्या घडीला वादात अडकला आहे. त्यामुळे आता या वर्षात मुंबई इंडियन्सचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *