[ad_1]

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने आता यावर्षी आयपीएलचा मोसम सुरु होण्यापूर्वीच निवृत्ती जाहीर केली आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी नेमकं असं घडलं तरी काय, याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ सध्याच्या घडीला चांगलाच चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सच्या संघातील वाद आता चव्हाट्यावर आलेली नाही. रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आणि त्यानंतर मोठा वाद सुरु झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर या गोष्टी चांगल्याच वेग धरत होत्या आणि व्हायरलही झाल्या. पण आता मुंबई इंडियन्सच्या संघातील एक खेळाडू आता या आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे समोर आहे आहे. कारण आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वीच या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. यावेळी निवृत्ती जाहीर करताना सौरभ तिवारीने सांगितले की, ” निवृत्ती घेण्याची माझी ही योग्य वेळ आहे, असे मला वाटते. तुम्ही जर राष्ट्रीय किंवा आयपीएलच्या संघात नसाल तर तुम्ही एका युवा खेळाडूची जागा अडवत आहात, असे मला वाटते. त्यामुळे युवा खेळाडूसाठी मी संघातील जागा सोडत आहे. कसोटी संघात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी मिळत आहे आणि त्यामुळेच मी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.” भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली जेव्हा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता, त्यामध्ये महत्वाची भूमिका ही सौरभची होती. सौरभ भारताकडून तीन वनडे सामने खेळला आणि त्यामध्ये त्याने ४९ धावा केल्या होत्या.

मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद पांड्याला, पुणेकरांच्या प्रतिक्रिया काय?

सौरभव तिवारी हा झारखंडकडून क्रिकेट खेळला. यावेळी त्याने ११५ सामने खेळले आणि त्यामध्ये ८०३० धावा केल्या, यामध्ये २२ शतकं आणि ३४ अर्धशतकांचा समावेश होता. आयपीएलच्या काही मोसमांत सौरभने चमक दाखवली खरी. पण त्याला कामगिरीत सातत्य ठेवता आले नाही. त्यामुळेच तो आयपीएलमध्ये सातत्याने खेळू शकला नाही. आता तर या आयपीएलच्या मोसमापूर्वीच निवृत्ती स्विकारली आहे. त्यामुळे आता तो आयपीएल किंवा कोणत्याही व्यावसायिक क्रिकेटमध्ये दिसणार नाही.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *