प्रियांका पाटील शेळके – बोबडेअहमदनगर: नेवासा तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातील आजोबांनी दत्त मंदिरात भजन सुरू करत आपल्या अंत्यविधीचे सामान जवळ ठेवलं आहे. न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण भजन सुरू ठेवणार, असं म्हणत आपल्या अन्यायाची कैफियत मांडली आहे. आमची जमीन कुठलीही संमती नसताना परस्पर स्वार्थासाठी स्वत:च्या नावावर करुन घेतली. चोरून घेतलेल्या मिळकतीसाठी शब्द रुपाचे भांडवल करून न्याय दैवतेसमोरही फौजदारी गुन्ह्यात मुळ मालकवरच खोटे आरोप करत याचे भांडवल केल्यामुळे आमच्या आयुष्यातील दहा वर्षे आर्थिक, मानसिक जो काही छळ झालेला आहे, तो आता पुरे झाला असून गावातील वाद हा गावातच मिटविण्यासाठी गावातील अनेक प्रतिष्ठित, धार्मिक, राजकीय आणि शासकिय अधिकाऱ्यांनी हा रितसर वाद गावातच थांबवावा म्हणून मध्यस्थीची भूमिका घेतली. मात्र हा वाद काही केल्या मिटत नसल्यामुळे आणि आमचीही आता प्रशासकीय तसेच न्यायप्रविस्ट वाद चालविण्याची मानसिकता राहिलेली नाही. आता हा वाद ग्रामदैवत हनुमान मंदिरातच मिटावा म्हणून गळनिंब (ता.नेवासा) येथील श्रीदत्त भक्त दिगंबर भिमराज शेळके यांनी आता या विनाकारण होत आहे. या वादाच्या छळास कंटाळून विरोधी कुटुंबापुढे आत्मसमर्पण करीत सोमवार (दि.१२) रोजीपासून सकाळी १० वाजता गावातील हनुमान मंदिरासमोर न्याय मिळेपर्यंत भजन सुरु केले आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी अधिक सविस्तर माहिती देतांना दिगंबर शेळके पुढे म्हणाले की, सुमारे पाचशे वर्षानंतर श्रीरामाला अखेर न्याय मिळाल्यामुळे ते आपल्या जन्मस्थानी विराजमान झालेले आहेत. श्रीरामालाही न्यायासाठी अनेक वेदना भोगाव्या लागलेल्या असून मी सुद्धा एक दत्तभक्त आहे. गेल्या दहा वर्षांपासून चालत आलेल्या प्रशासकीय छळास आपण वैतागलेलो असून याबाबत मी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्याकडे आमच्या कुटुंबांच्या झालेल्या फसवणुकीबाबतची कैफियत मांडलेली आहे. मला दिल्लीत नव्हे तर गावातील गल्लीतच न्याय मिळावा म्हणून गावातील जेष्ठ-श्रेष्ठ आणि सत्याच्या बाजूने नेहमीच माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या अनेकांनी सांगूनही प्रतिस्पर्धी लोक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. त्यामुळे मला आता आत्मसमर्पण करुन हनुमान मंदिरात भजन करण्याचा आपण निर्णय घेत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. दिगंबर शेळके यांना वडिलोपार्जित पाच एकर जमीन होती. लहान बहिणीच्या लग्नासाठी त्यांच्या वडिलांनी एक एकर जमीन सावकारांकडून पैसै घेऊन एक एकर जमीन त्यांना व्याजापोटी कसण्यास दिलेली होती. कसण्यास दिलेली ही जमीन आमची संमती नसताना ती परस्पर कशी काय नावावर झाली? नावावर झाल्यानंतर आता रस्त्यासाठीही या महाशयाने खोटेनाटे कुभांड रचत आमच्या विरोधात कटकारस्थान रचत असल्यामुळे गावातील प्रतिष्ठित लोकांनी समोरच्या व्यक्तीला समजून सांगितलेले आहे. मात्र हा वाद काय मिटत नसल्यामुळे मला आता न्याय मिळेपर्यंत गावातील हनुमान मंदिरात आत्मसमर्पण करुन भजन गाण्याचा निर्णयही दिगंबर शेळके यांनी घेतलेला आहे. त्यामुळे सत्याच्या बाजूची पडताळणी करुन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या शांततेच्या मार्गाने न्याय मागणाऱ्या शेळके यांना न्याय देण्याची मागणी गळनिंब (ता.नेवासा) येथील ग्रामस्थांमधून केली जात आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *