[ad_1]

मुंबई: बॉलिवूडचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनं सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. नितीन देसाईंना मानसिक त्रास दिल्याप्रकरणी एडलवाइस कंपनीच्या पाच पदाधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. नितीन देसाई यांच्या पत्नीनं ही तक्रार दाखल केली आहे.

एडलवाइज फायनान्स कंपनीचं अधिकारी आणि प्रशासकांसह पाच जणांना नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. मंगळवारी, आज आठ ऑगस्टला खालापूर पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. तसंच या प्रकरणातील कर्जाची कागदपत्रे आणि माहितीही मागविण्यात आली होती. आता कंपनीकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.
चाहता गर्दीतून आला आणि थेट हात पडकला…तमन्नानं असं काही केलं की नेटकऱ्यांनी केलं कौतुक

या प्रकरणात आता राजकुमार बन्सल आणि रासेश शहा यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रासेश शहा यांनी याचिकेद्वारे खालापूर पोलिसांकडून करण्यात आलेला एफआयआर रद्द करावा, अशी मागणी केली आहे. एडलवाइस कंपनीकडून अमित देसाई हे लोकप्रिय वकील खटला चावलणार आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?
कलेची आवड असलेले नितीन देसाई यांनी २००५ मध्ये सुमारे ५३ एकर जागेवर एनडी स्टुडिओची उभारणी केली होती. रायगड जिल्ह्यातील चौक इथं उभारण्यात आलेल्या या स्टुडिओमध्ये अनेक मोठे सेट उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांचे शूटिंग करण्यात आलं आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी २०१६ आणि २०१८ मध्ये या जागेतील ४२ एकर जागेवर सुमारे १८० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आलं होतं. या कर्जाची रक्कम सुमारे २५२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. कर्ज न फेडल्यानं त्यांच्या कंपनीवर दिवाळखोरीची प्रक्रिया गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रीय कंपनी विधी लवादाच्या मुंबई पीठानं २५ जुलै रोजी एडलवाइस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने दाखल केलेल्या दिवाळखोरीची प्रक्रिया दाखल करून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
जुळ्या मुलींची नावं झिया आणि जायदा का ठेवली? समीर वानखेडेंनी सांगितली नावांमागची गोष्ट
दरम्यान, नितीन देसाई यांनी एका ऑडिओ रेकॉर्डरमध्ये सुमारे ११ ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्या असून, त्यामध्ये ही या संदर्भात मानसिक त्रास देण्यात आल्याचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या ऑडिओ क्लिप्सची तपासणी ही पोलिस आणि फॉरेन्सिक टीममार्फत करण्यात येत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

या पार्श्वभूमीवर देसाई यांच्या पत्नी नेहा यांनी शुक्रवारी खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी एडलवाइज फायनान्स कंपनी आणि पाच पदाधिकाऱ्यांविरोधात कलम ३०६ आणि ३४ अन्वये तक्रार दाखल करण्यात करण्यात आली होती. यामुळं नितीन देसाई यांच्या आत्महत्येचं नेमके कारण समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, आणखी किती आणि कोणत्या व्यक्तींची नावे समोर येणार, याकडं लक्ष लागलं आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *