[ad_1]

मुंबई: कला विश्वातील विश्वकर्मा अशी ओळख असणाऱ्या नितीन चंद्रकांत देसाई यांचे २ ऑगस्ट रोजी निधन झाले. देसाई यांनी त्यांच्या कर्जत याठिकाणी असणाऱ्या स्वप्नवत अशा एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणात हाती लागलेल्या देसाईंच्या रेकॉर्डिंगवरुन पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. या सर्वात आणखी एक गोष्ट मनाला चटका लावून गेली ती म्हणजे त्यांच्या वाढदिवसाला अवघे ४ दिवस शिल्लक असताना देसाई यांनी असा टोकाचा निर्णय घेतला.

६ ऑगस्ट रोजी नितीन देसाई यांचा जन्मदिवस असतो. यंदा त्यांनी वयाची ५८ वर्ष पूर्ण केली असती. मात्र वाढदिवसाच्या काहीच दिवस आधी त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नितीन यांनी त्यांची पत्नी आणि मुलीला आधीच सांगितले होते की ते यंदाचा वाढदिवस साजरा करणार नाहीत. मात्र कोणाच्याही ध्यानीमनीही नव्हते की ते वाढदिवस साजरा करणार नाहीत, याचा अर्थ इतका भीषण असेल.

वाढदिवसाच्या ४ दिवस आधी नितीन देसाईंनी संपवलं जीवन; गेल्यावर्षी दणक्यात साजरा केलेला हाच दिवस
त्यांचे जवळचे सहकारी नितीन कुलकर्णी यांनी नितीन देसाई यांनी वाढदिवस साजरा करण्याविषयी काय भाष्य केले होते ते सांगितले. कुलकर्णी यांनी असे म्हटले की, ‘देसाई यांचा वाढदिवस ६ ऑगस्टला होता. त्यामुळे त्यांच्या पत्नीने आणि मुलीने असा आग्रह धरला होता की मुलगी अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांचा वाढदिवस साजरा केला जावा. पण देसाई यांनी त्यांना सांगितले की, यावर्षी ते त्यांचा वाढदिवस साजरा करणार नाहीत.’

नितीन कुलकर्णी यांनी पुढे म्हटले की, ‘कोणी स्पप्नातही विचार केला नव्हता की वाढदिवस साजरा न करणे म्हणजे असे काहीतरी भयानक असेल.’ ईटाइम्सशी बोलताना कुलकर्णी यांनी अशी प्रतिक्रिया दिली.

गेल्यावर्षी दणक्यात साजरा झालेला वाढदिवस

नितीन यांचे बरेचसे वाढदिवस त्यांच्या ND स्टु़डिओमध्ये साजरे करण्यात आले होते. गेल्यावर्षी त्यांनी एनडी स्टुडिओमध्ये त्यांच्यासोबत काम करणारी टीम आणि जवळची मंडळी यांच्यासोबत मोठ्या दणक्यात वाढदिवस साजरा केला होता. त्यांनी सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचे काही व्हिडिओ आणि फोटोही शेअर केलेत. शिवाय त्यांनी सर्वांचे आभार मानणारी एक व्हिडिओ पोस्टही शेअर केली होती.

Subhedar Trailer: ‘५०० गडी लई झालं…’ तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा अन् सिंहगडाचा पोवाडा ऐकवणार ‘सुभेदार’
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार नितीन कुलकर्णी

दरम्यान कुलकर्णी यांनी असेही म्हटले की ते या प्रकरणाविषयी बोलण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यामुळे नितीन देसाईंच्या पत्नीला यातून योग्य मार्ग काढण्यास मदत होईल. शिवाय कर्जदार कंपनीकडून त्यांना छळ किंवा दबावाचा सामना करावा लागणार नाही.

‘ज्या दिवशी देसाई दिल्लीहून परतले आणि स्वत:चा जीव घेतला, त्या दिवशी त्यांनी स्टुडिओ वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न केला. देसाई यांच्यावर फायनान्स कंपनीने एवढा दबाव टाकला होता की त्यांना आता हा ताण सहन होत नव्हता असेही त्यांनी म्हटले’, असेही कुलकर्णी म्हणाले.

वडिलांची आठवण, भव्य संमेलन; नितीन देसाईंचं दापोलीच्या शाळेतील भाषण

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *