[ad_1]

आपल्या पश्चात आपल्या वारसदारांना आपल्या संचित रकमेचे विनासायास वाटप व्हावे असे वाटत असेल तर, विमा पॅालिसीसाठी नामांकन (नॉमिनी) करणे आवश्यक आहे. विमा पॉलिसी घेताना नॉमिनी ज्याला करायचे असेल म्हणजेच नामांकन ज्या व्यक्तीच्या नावे करायचे असेल, त्या व्यक्तीचे संपूर्ण नाव, वय, विमेदाराबरोबरचे नाते, पत्ता ही सर्व माहिती विमा प्रस्तावात अचूक भरणे गरजेचे असते. कारण, या माहितीची खातरजमा करणे विमा कंपनीस शक्य नसते. कधीकधी जन्म नाव, टोपण नाव, शाळेच्या दाखल्यावरील नाव वेगवेगळे असते. अशावेळी कागदोपत्री असलेले नाव म्हणजे आधार कार्डावरील किंवा पारपत्रावरील (पासपोर्ट) नाव नमूद करण्याची काळजी घ्यावी.पॉलिसी सुरू असताना नामित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, लगेच नवीन नॉमिनेशन करणे आवश्यक असते. बरेचदा या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष होते. सामान्यतः पेन्शनच्या पॉलिसीवर पती किंवा पत्नीचे नामांकन असते. वृद्धापकाळात दोघांपैकी एकाचा मृत्यू झाल्यावर, पुनर्नामांकन करण्याची वेळ येते. अनेकदा मुले परगावी किंवा परदेशी असतात. त्यांना याबद्दल कल्पना नसते किंवा वेळ नसतो. अशा वेळी आपणच ही बाब त्यांच्या निदर्शनास आणावी आणि नामांकन बदलून घ्यावे. सामान्यतः विमा पॉलिसी जर विवाहापूर्वी घेतली असेल तर नामांकन आई किंवा वडील यांचे नावे केलेले असते. विवाहानंतर ते पत्नीच्या नावे बदलून घेणे राहून जाते. अशा वेळी दुर्दैवाने जर विमेदाराचा मृत्यू झाला तर गृहकलह निर्माण होण्याची शक्यता असते. काही वेळा असेही झाल्याची उदाहरणे आहेत, की पत्नीकडे विमा पॉलिसी आणि त्यावर नामांकन तिच्या सासूचे म्हणजे मृत विमेदाराच्या आईचे. दोघींमधून जर विस्तव जात नसेल, तर सून सासूला पॉलिसीवर सासूचे नामांकन असल्याचेही सांगत नाही आणि तिला ती विमा पॉलिसी पण सुपूर्द करत नाही! सासूला तर याची माहितीही नसते की तिच्या नावे मुलाने नामांकन केले आहे. सुनेला ही भीती असते की, न्यायालयाकडून वारसदार प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खटाटोप तिने करायचा, मात्र न्यायालय संपूर्ण रक्कम काही तिला देणार नाही, म्हणून ती हा खटाटोप करणे टाळते आणि मग विमा कंपनीकडे मृत्यूदावाच न आल्याने ही रक्कम विमा कंपनीकडे पडून राहते.विमा हा दीर्घ मुदतीचा करार आहे. स्वाभाविकच पॉलिसीच्या कालावधी दरम्यान विमेदाराच्या आयुष्यात देखील अनेक स्थित्यंतरे घडतात. नॉमिनी बदलण्याची गरज पती-पत्नी विभक्त झाले तर येऊ शकते अथवा पॉलिसीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी नामित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नवीन नामित व्यक्ती नियुक्त करण्याची गरज भासू शकते. नातेसंबंधात बदल झाले, जसे काही कारणाने नामित व्यक्तीशी संबंध बिघडले तरी नवीन नामांकन करणे गरजेचे भासू शकते.अवयस्क व्यक्तीचे नामांकननामांकन अवयस्क (मायनर) व्यक्तीच्या नावाने सुद्धा करता येते. असे करायचे असेल तर १८ वर्षे वयाहून अधिक वय असलेल्या नात्यातील व्यक्तीस अवयस्क व्यक्तीच्यावतीने व्यवहार करण्यास नियुक्त करावे लागते. अशा व्यक्तीची संमती प्रस्तावपत्रावर घ्यावी लागते. विमेदाराच्या मृत्यूचे वेळी अशा नामित व्यक्तीचे वय जर १८ वर्षांहून अधिक झाले असेल तर, दाव्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास तो पात्र असतो. मात्र, जर अशा प्रसंगी तो अवयस्कच असेल, तर नियुक्त व्यक्तीला विमा कंपनी दाव्याची रक्कम सुपूर्द करते. या रकमेचा विनियोग नियुक्त व्यक्तीने अवयस्क असलेल्या नामित व्यक्तीच्या किंवा वारसदारांच्या उपयोगासाठी करणे अपेक्षित असते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *