[ad_1]

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाण्यात वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक १६ पेट्रोल पंपावर शिवसेनेच्या वतीने एक लिटर पेट्रोल वाहन चालकांना मोफत दिले जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख दत्ता फासले यांच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमाद्वारे मोफत पेट्रोल भरण्यासाठी वाहनचालकांनी पंपावर लांबच लांब रांगा लावल्या आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या ठाण्यातील खासगी निवासस्थानाबाहेर गुरुवारी रात्री पोलिसांकडून मेगाफोनद्वारे उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी कोणीही मोबाईल अथवा कॅमेरा घेऊन प्रवेश करू नये, तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना फोटो काढू नये, यासोबतच शिंदे यांच्या बंगल्याच्या परिसरात फटाक्यांची कोणतीही आतषबाजी करू नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या.
तावडे, पाटील, चित्रा वाघ; राज्यसभेच्या तीन जागांसाठी भाजपची ९ नावं चर्चेत, पंकजांनाही तिकीट?
मुंबईत ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या वतीने रात्री वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

तुमच्यासारख्या व्यक्तीची समाजाला गरज; अण्णा हजारेंकडून एकनाथ शिंदेंना खास वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज ६० वा वाढदिवस असून ठाण्यात दोन दिवसांपासून शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ठाण्यात विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यांचा धडाका लावण्यात आला आहे. शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात सर्वत्र बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे. मात्र गुरुवारी रात्री मुंबईत ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या ठाण्यातील खासगी निवासस्थानी दरवर्षी जल्लोषात होणारे वाढदिवसाचे सेलिब्रेशन टाळण्यात आले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

मुख्यमंत्री शिंदे यांनी कुटुंबियांसमवेत साधेपणाने वाढदिवस साजरा केला. तर दुसरीकडे त्यांच्या निवासस्थानाबाहेर उपस्थित कार्यकर्त्यांना पोलिसांनी मेगाफोनद्वारे सूचना देत कोणीही मोबाईल अथवा कॅमेरा आतमध्ये नेऊन शिंदे यांच्या समवेत फोटोसेशन करू नये अशा सूचना दिल्या. तसेच फटाक्यांची आतषबाजी करू नये असेही बजावले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *