मुंबई: शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर काल जीवघेणा हल्ला झाला. मुंबईच्या पश्चिनम उपनगरात असलेल्या दहिसर पश्चिमेतील आयसी कॉलनीत घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण रक्तस्राव जास्त झाल्यानं त्यांचा जीव वाचू शकला नाही. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस भाईनं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. मेहुल पारिख आणि रोहित साहू अशी दोघांची नावं आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला त्यावेळी मेहुल पारीख तिथेच हजर होता असं सांगितलं जातं. तसा उल्लेख फेसबुक लाईव्हवेळी घोसाळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नोरोन्हानं केला. पोलिसांनी घटनास्थळावरुन १ पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेला मेहुल पारीख हा मॉरिसचा पीए आहे. त्याच्या चौकशीतून मॉरिसबद्दलची महत्त्वाची माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे. मॉरिस आणि अभिषेक यांच्यामध्ये बऱ्याच कालावधीपासून वाद होते. मॉरिसला तुरुंगवास घडला होता. अभिषेक यांच्यामुळेच आपापल्या तुरुंगात जावं लागल्याचा त्याचा समज होता. त्यामुळे मॉरिसचा अभिषेक यांच्यावर राग होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मॉरिसनं अभिषेक यांच्याशी जवळीक साधली. आपाल्यातले मतभेद दूर झाल्याची माहिती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देऊ, असं म्हणत मॉरिस अभिषेक यांना त्याच्या कार्यालयात घेऊन गेला. अभिषेक यांच्यासोबतचे मतभेद दूर झाले होते तर मग मॉरिसनं त्यांना का संपवलं, त्यानंतर आत्महत्या का केली, खुनामागे काही राजकीय अँगल होता का, असे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं मॉरिसचा पीए मेहुल पारीखकडून मिळू शकतात. त्याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी रोहित साहू नावाच्या तरुणालादेखील ताब्यात घेतलं आहे. त्याचीही चौकशी केली जात आहे. त्याच्याबद्दल अद्याप पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *