[ad_1]

नवी दिल्ली : OnePlus ने एक खास ऑफर आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. या ऑफर अंतर्गत, OnePlus प्रोडक्ट्स अगदी परवडणाऱ्या अशा सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध करून दिली जात आहेत. त्यामुळे लाखोंचे प्रोडक्ट्स तुम्ही परवडणाऱ्या किंमतीत घेऊन जाऊ शकतो. सर्व दमदार ऑफरनंतर, युजर्स OnePlus 11 5G, OnePlus Pad आणि Buds Pro 2 उत्पादने सोप्या EMI च्या ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात. तुम्ही OnePlus प्रेमी असाल तर तुम्हाला ही ऑफर आवडू शकते. चला तर मग जाणून घेऊया OnePlus Ensemble ऑफर्सबद्दल…

या ऑफर अंतर्गत, तुम्ही OnePlus 11 5G, OnePlus Pad आणि Buds Pro 2 उत्पादने खरेदी केल्यास, तुम्हाला तिन्ही प्रोडक्ट्सचा मिळून एक EMI भरावा लागेल. म्हणजे OnePlus 11 5G च्या 16 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज वेरिएंट (Eternal Green) ची किंमत ६१,९९९ रुपये आहे. त्याच वेळी, OnePlus Buds Pro 2 च्या आर्बर ग्रीन कलर वेरिएंटची किंमत ११,९९९ रुपये आहे. त्याच वेळी, वनप्लस पॅडच्या 12 जीबी रॅम आणि 256 स्टोरेज वेरिएंटची किंमत ३९,९९९ रुपये आहे. या तिन्हीची एकूण किंमत १,१३,९९७ रुपये आहे. या सर्वाचा एकच EMI भरावा लागेल. यासह, ICICI आणि OneCard वापरण्यावर ४ हजार रुपयांपर्यंतची इन्स्टंट बँक सूट दिली जाईल, त्यानंतर किंमत १,०९,९९७ रुपयांपर्यंत खाली येईल. यासोबतच २४ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही दिला जाणार आहे. त्यामुळे हा EMI ४,५०० रुपये असेल. यासोबतच रिप्लेसमेंट आणि वॉरंटीही दिली जात आहे.

ऑफर कुठे मिळवायची?
ही ऑफर फक्त OnePlus Experience Store वर दिली जात आहे. वापरकर्ते ही ऑफर बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि लखनऊ येथे असलेल्या OnePlus स्टोअर्समधून हे सारं विकत घेऊ शकता.

वाचा : Instagram Tips : इन्स्टाग्रामवर एकदम क्लिअर व्हिडीओ कसा अपलोड करायचा? लाईक्सचा पडेल पाऊस

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *