[ad_1]

नवी दिल्ली : Using Cracked Screen Smartphone : स्मार्टफोनची स्क्रीन बाजूने तुटणे किंवा तडे जाणे ही एक फारच सामान्य गोष्ट झाली आहे. कारण फोनची स्क्रीन ही काचेची असल्याने नाजूक असते, अशा परिस्थितीत चुकून फोन पडला तर स्क्रीन लगेट तुटण्याची शक्यता असते. अनेक वेळा लोक तुटलेल्या स्क्रीनसहच काम करतात म्हणजे तसाच फोन वापरत असतात. कारण स्क्रीन दुरुस्त करण्यासाठी खूप खर्च येत असतो. पण असे करणे फोनसाठी धोकादायक ठरू शकते. कसे ते जाणून घेऊया.

फोनच्या आत कचरा जाऊ शकतो: जर तुम्ही तुटलेली स्क्रीन असलेला फोन वापरत असाल, तर त्या तडकांमधून घाण किंवा धूळ आत जाऊ शकते. यामुळे फोन पूर्णपणे खराब होऊ शकतो. फोनची स्क्रीन आतील पार्ट्ससाठी सुरक्षा स्तर आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा हा थर तुटतो तेव्हा कचरा आतील पार्ट्सपर्यंत पोहोचते आणि फोन खराब होऊ शकतो.

टच रिस्पॉन्स: स्मार्टफोनचा डिस्प्ले क्रॅक झाला किंवा तुटला तर त्यावर फार काही करता येत नाही. कारण हा फोनचा मुख्य घटक आहे आणि त्यातूनच फोन चालवला जातो. जर स्क्रीन क्रॅक झाल्यामुळे एका बाजूला डिस्प्ले काम करत नसेल आणि तरीही तुम्ही फोन दुसऱ्या बाजूने वापरत असाल तर त्याचा टच पूर्णपणे काम करणे थांबवू शकते.

डोळ्यांवर परिणाम: फोनमधून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांना हानी पोहोचवू शकतो. आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, फोनची स्क्रीन हा एक प्रोटेक्शन स्तर आहे, अशा परिस्थितीत, जेव्हा हा स्तर तुटतो तेव्हा प्रकाशाचा थेट परिणाम वापरकर्त्याच्या डोळ्यांवर होतो. हे डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकते.

वाचा : Instagram Tips : इन्स्टाग्रामवर एकदम क्लिअर व्हिडीओ कसा अपलोड करायचा? लाईक्सचा पडेल पाऊस

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *