[ad_1]

OnePlus नं काही भारतीय युजर्ससाठी आजीवन स्क्रीन वॉरंटीची घोषणा केली आहे त्यामुळे हिरवी रेष येणाऱ्या वनप्लस फोन युजर्सना दिलासा मिळाला आहे. अनेक वनप्लस युजर्सनी अ‍ॅमोलेड डिस्प्ले असलेल्या जुन्या वनप्लस फोनमध्ये हिरवी रेष येत असल्याची माहिती दिली आहे, त्यामुळे कंपनीनं हे पाऊल उचललं आहे.

हिरवी रेष येण्याची समस्या वनप्लस फोन्समध्ये अपडेटनंतर येत आहे. ह्यात कंपनीच्या OnePlus 8 Pro, OnePlus 8T, OnePlus 9 आणि OnePlus 9R ह्या मॉडेल्सचा समावेश आहे. त्यामुळे ह्या मॉडेल्सवर कंपनी आता आजीवन डिस्प्ले वॉरंटी देत आहे. ज्या युजर्सना आपल्या OnePlus 8 आणि OnePlus 9 सीरीज फोनमध्ये हिरव्या रेषेची समस्या येत आहे त्यांना ह्या वॉरंटी अंतगर्त मोफत स्क्रीन रिपेयर करून मिळेल. ही लाइफटाइम स्क्रीन वॉरंटी फक्त भारतीय युजर्ससाठी उपलब्ध आहे.

निवडक मॉडेल्सवर व्हाउचर मिळणार

अँड्रॉइड अथॉरिटीनं देखील ह्या समस्येनं त्रासलेल्या युजर्ससाठी लाइफटाइम स्क्रीन वॉरंटी देण्याची वनप्लसची अधिकृत स्टेटमेंट शेयर केली आहे. त्यात कंपनीनं म्हटलं आहे की, “आमच्या निदर्शनास आलं आहे की ह्या समस्येमुळे युजर्सना खूप त्रास होत आहे आणि आम्ही ह्यासाठी माफी मागत आहोत. आम्ही युजर्सना स्मार्टफोन ठीक करण्यासाठी जवळच्या वनप्लस सर्व्हिस सेंटरवर ज्याण्याचा सल्ला देत आहोत आणि आम्ही ह्या समस्येला बळी पडलेल्या सर्व स्मार्टफोनला फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट देईल. तर निवडक OnePlus 8 आणि OnePlus 9 सीरीज स्मार्टफोनसाठी आम्ही एक व्हाउचर देखील देत आहोत ज्यामुळे युजर्सना नवीन वनप्लस स्मार्टफोनवर अपग्रेड करण्यासाठी फोनच्या किंमतीची योग्य व्हॅल्यू मिळेल. सध्याची परिस्थिती पाहता आता आम्ही सर्व समस्याग्रस्त स्मार्टफोनवर लाइफटाइम डिस्प्ले वॉरंटी देण्याची घोषणा करत आहोत. तुमच्या सहकार्यासाठी धन्यवाद.”

मीडिया रिपोर्टनुसार, OnePlus एक्सक्लूसिव्ह सर्व्हिस सेंटरमधील नोटिसमध्ये ग्रीन लाइनची समस्या असणाऱ्या ग्राहकांना अपग्रेड डिस्काउंटची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे युजर्स नवीन वनप्लस स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी खराब स्मार्टफोन एक्सचेंज करू शकतात. ह्यासाठी त्यांना वनप्लस इंडिया वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन खरेदी करावी लागेल. जे लोक इंडिया-एक्सक्लूसिव्ह OnePlus 10R खरेदी करतील त्यांना व्हाउचर स्वरूपात ४,५०० रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकेल.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *