[ad_1]

नवी दिल्ली : Samsung Flip Phones : दक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने काही दिवसांपूर्वी Galaxy Z Fold 5 आणि Galaxy Z Flip 5 स्मार्टफोन लाँच केले होते. हे कंपनीचे लेटेस्ट फोल्डेबल फोन आहेत. त्यांचे प्री-बुकिंगही सुरू झाले आहे. विशेष म्हणजे भारतात या दोन फोनच्या प्री-बुकिंगच्या २८ तासांत, तब्बल १ लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी फोन्स प्री-बुक केले आहे.

याधीच्या Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 च्या तुलनेत, Samsung च्या नवीन फोन्सना १.७ पट अधिक प्री-बुकिंग मिळाले आहे. भारतात, Galaxy Z Flip5 आणि Z Fold5 साठी २७ जुलै २०२३ पासून प्री-बुकिंग सुरू झाली. त्यांची विक्री १८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

Galaxy Z Flip 5 आणि Galaxy Z Fold 5 किंमत

Galaxy Z Flip 5 च्या 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ९९,९९९ रुपये आहे. त्याच वेळी, Galaxy Z Fold 5 च्या 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १,५४,९९९ रुपये आहे. Galaxy Z Flip 5 प्री-बुक करणार्‍या वापरकर्त्यांना तब्बल २० हजार रुपयांचे फायदे दिले जातील. त्याच वेळी, Galaxy Z Fold 5 च्या प्री-बुकिंगवर २३ जार रुपयांचे फायदे दिले जातील. हे ऑफलाइन आणि ऑनलाइन रिटेल स्टोअरमधून प्री-बुक केले जाऊ शकतात.

Samsung Galaxy Z Fold 5 आणि Samsung Galaxy Z Flip 5 चे फीचर्स
Galaxy Z Fold 5 मध्ये ७.६ इंचाचा QXGA+ (2176 x 1812 पिक्सेल) डायनॅमिक AMOLED 2X इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश दर 120 Hz पर्यंत आहे. त्याच वेळी, Galaxy Z Flip 5 मध्ये ६.७ इंच फुल एचडी प्लस (1080×2640 पिक्सेल) डायनॅमिक AMOLED 2X इन्फिनिटी फ्लेक्स पॅनेल आहे. दोन्ही फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 2 प्रोसेसरने सुसज्ज आहेत.
फोल्ड फोनमध्ये 12 GB RAM आणि 1 TB पर्यंत स्टोरेज आहे. त्याच वेळी, फ्लिप फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. हा फोन Android 13 वर आधारित OneUI 5.1.1 वर काम करतो.

फोल्ड फोनमध्ये ५० मेगापिक्सेल वाइड-एंगल लेन्स, १२ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि १० मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स समाविष्ट आहेत. फोनच्या बाह्य डिस्प्लेमध्ये १० मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर ४ मेगापिक्सलचा अंडर-डिस्प्ले कॅमेरा देण्यात आला आहे. Galaxy Z Flip 5 मध्ये दोन १२ मेगापिक्सल लेन्स आणि १० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. Galaxy Z Fold 5 मध्ये 4400 mAh बॅटरी आहे जी 25W वायर्ड चार्जिंगसह येतो. यात फास्ट वायरलेस चार्जिंग 2.0 आणि वायरलेस पॉवरशेअर सपोर्ट देखील आहे. Galaxy Z Flip 5 मध्ये 3700 mAh ची बॅटरी आहे.

वाचा : JioBook येताच भारतात लॅपटॉप आयात करण्यावर बंदीचा नियम? काय आहे नेमकं कनेक्शन?

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *