[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई-नवी मुंबई अंतर कमी करणाऱ्या अटल सेतूवरून दादर-पुणे शिवनेरी एसटी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर जवळपास महिना होत आला तरी तेथून एसटी धावलेली नाही. पुणे शिवनेरी प्रस्तावित असतानाच आता सेतूवरून मुंबई-अलिबाग एसटी चालवण्याचे मानस महामंडळाचा आहे. या दोन मार्गांसाठी आता प्रवाशांचे अभिप्राय घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई-नवी मुंबईला सागरी मार्गाने जोडणारा अटल सेतू १३ जानेवारीला खुला झाला. महामंडळाने एक दिवस आधी अटल सेतू मार्गाचे सर्वेक्षण केले. दादर-शिवडी-अटल सेतू-गव्हाण फाटा-कोन-यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गे पुणे अशा शिवनेरी प्रवासात एका तासाची बचत होते. दादर-शिवडी-अटल सेतू-चिरनेर-खारफाटा-पेणमार्गे अलिबाग या प्रवासात दीड तासांची बचत होत आहे, असा शेरा एसटीच्या वाहतूक विभागाचा आहे. सर्व गाड्यांऐवजी मोजक्याच थेट गाड्या चालवण्यास हरकत नाही, असे एसटी अधिकाऱ्यांचे ही मत आहे. मात्र आता महामंडळाने दोन्ही मार्गांसाठी प्रवासी अभिप्राय घेण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटीच्या प्रवासी अभिप्रायात ‘आपण या सेवेचे लाभ घेऊ इच्छिता का?’, ‘एसटी सेवा मुंबईत प्रवेश केल्यावर कोणत्या मार्गे असावी’, दादर-पुणे शिवनेरीची मुंबई व पुणे येथून ‘अपेक्षित वेळा’ आणि मुंबई-अलिबाग एसटीच्या मुंबई-अलिबाग येथून ‘अपेक्षित वेळा’ अशी माहिती द्यावी लागणार आहे. सोबतच प्रवाशांना आपले नाव आणि मोबाइल क्रमांक अभिप्रायात नोंदवावा लागणार आहे. राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग म्हणून मुंबई-पुणे ओळखला जातो. मुंबई-पुणे दरम्यान रेल्वेगाड्या, शेअर खासगी कार, कूल कॅब, शिवनेरी, एसटी, खासगी ट्रॅव्हल्स अशा वाहनांतून प्रवासी वाहतूक होते. या सर्व गाड्यांना प्रवाशांची मोठी मागणी असते. मुंबई-पुणेदरम्यान अटल सेतूमुळे नवा मार्ग खुला झाला आहे. सध्याच्या पनवेलमार्गे वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. यामुळे अटल सेतूवरून मोजक्या आणि थेट एसटी सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी सातत्याने करत आहे.

१२ फेब्रुवारीस अहवाल मिळणार

दादर-पुणे, मुंबई-अलिबाग अटलसेतू मार्गे सुरू करण्याबाबत अभिप्राय देण्याच्या सूचना मुंबई, पुणे आणि रायगड विभागाला देण्यात आल्या आहेत. १२ फेब्रुवारीअखेर अभिप्रायाचा अहवाल एसटी मुख्यालयाला प्राप्त होणार आहे. साधारणपणे पुढील आठवड्यात अटल सेतूमार्गे शिवनेरी सुरू करण्यात येणार आहे, असे एसटीतील वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

PF Interest Rate: कोट्यवधी नोकरदारांना बसणार धक्का, पीएफवरील व्याज कमी करण्याची तयारी; वाचा सविस्तर

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *