मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) निर्बंधानंतर पेटीएमची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशनच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. एकीकडे शेअरमध्ये सतत पडझड होत असताना वापरकर्तेही या ॲपचा वापर करण्यापासून थांबवत आहे. या सर्व हालचालींदरम्यान कंपनीत मोठा उलटफेर झाला आहे. पेटीएम ई-कॉमर्स कंपनीने आपले नाव बदलून पी प्लॅटफॉर्म केले आणि ऑनलाइन रिटेल व्यवसायात हिस्सा मिळवत ONDC वर विक्रेता प्लॅटफॉर्म बिट्सिलाचे अधिग्रहण केले.बिट्सिला हे ONDC वर विक्रेते प्लॅटफॉर्म असून कंपनीने सुमारे तीन महिन्यांपूर्वी नाव बदलण्यासाठी अर्ज केल्याचे मीडिया अहवालात म्हटले. तर ८ फेब्रुवारी रोजी कंपनी रजिस्ट्रारकडून नाव बदलण्यास मंजुरी मिळाली. या प्रमाणपत्राच्या तारखेपासून कंपनीचे रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या ८ फेब्रुवारीच्या अधिसूचनेनुसार, कंपनीचे नाव पेटीएम ई-कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड वरून पै प्लॅटफॉर्म प्रायव्हेट लिमिटेड असे बदलण्यात आले.कोणत्या कंपनीकडे अधिक हिस्सेदारीपेटीएम ई-कॉमर्समधील एलिव्हेशन कॅपिटल ही सर्वात मोठी शेअरहोल्डर आहे, ज्याला पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विजय शेखर शर्मा, सॉफ्टबँक आणि ईबे यांचाही पाठिंबा आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने आता इनोबिट्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (बिट्सिला) चे अधिग्रण केले जे २०२० मध्ये सादर करण्यात आलेले. हे फुल-स्टॅक सर्वचॅनेल आणि हायपरलोकल कॉमर्स क्षमतांसह ONDC विक्रेता प्लॅटफॉर्म म्हणून कार्य करते.पेटीएम स्टॉकमध्ये सतत पडझडदरम्यान, पेटीएम ब्रँडची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेडचे शेअर शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी कोसळले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (बीएसई) कंपनीचे शेअर ८.६७% घसरून ४०८.३० रुपयांवर तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर कंपनीचा शेअर ८.२०% कोसळला आणि ४१० रुपयांवर बंद झाला. याशिवाय वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेडचे शेअर गुरुवारी १० टक्क्यांनी खाली आले असून तत्पूर्वी, तीन सत्रांच्या जोरदार घसरणीनंतर गेल्या मंगळवारी स्टॉकने वेग पकडला होता.रिझर्व्ह बँकेच्या अलीकडच्या कारवाईनंतर सलग तीन सत्रात (१ ते ५ फेब्रुवारी) पेटीएमचा स्टॉक ४० टक्क्यांहून अधिक कोसळला. यामुळे कंपनीचे बाजार मूल्य (मार्केट कॅप) २०,४७१.२५ कोटी रुपयांनी खाली आले. वन97 कम्युनिकेशनचा PPBL मध्ये ४९% हिस्सा असून (थेट आणि उपकंपन्यांद्वारे) कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांची PPBL मध्ये ५१% हिस्सेदारी आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *