[ad_1]

कल्याण : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी एका दौऱ्यात कोल्ड कॉफी आणि सँडविच उपलब्ध करून देताना किती कसरत करावी लागली होती, याबाबतचे वक्तव्य केले होते. गुरुवारी कल्याणमध्ये आलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी कोल्ड कॉफी पिण्याची आठवण आली म्हणून आपण कल्याणमध्ये आल्याचे सांगत चिमटा काढला होता. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे युवा सचिव दीपेश म्हात्रे यांनी सँडविच कॉफीवर बोलून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करू नये, उद्धव ठाकरे गटाच्या लोकांना कॉफी सँडविच वाटण्यासाठीही माणसे मिळणार नसल्याचे म्हटले आहे.

म्हात्रे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे गटाला लक्ष्य केले. ‘कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विकासाचा आढावा त्यांच्या काळात कधीही घेतला गेला नाही, मात्र आता शहराचा इतका विकास झाला आहे की इथली जनता खासदार डॉ. शिंदे आणि मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभी आहे. त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीही नाही. विकासावर बोलण्याचे सोडून ते खोके आणि गद्दारीसारखे चार शब्दच वारंवार काढतात.’ अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे युवा सचिव दीपेश म्हात्रे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याचा खर्च काढला, आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर सडकून टीका

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

‘त्यांना कार्यकर्ते शोधूनही सापडत नाहीत. कार्यकर्ते शोधण्यासाठी नेत्यांना वारंवार मतदारसंघाचे दौरे करावे लागत आहेत. मात्र तुम्हाला माणसेही मिळणार नाहीत. आदित्य ठाकरे यांचे डोंबिवलीत आजोळ असतानाही त्यांना कल्याणनंतर डोंबिवलीत यावेसे वाटले नाही, याचा जाब मतदार त्यांना विचारतील,’ असेही ते म्हणाले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *