[ad_1]

मुंबई : गृहकर्ज, वाहन कर्ज, सोने तारण कर्ज यासारख्या इतर कर्जांच्या तुलनेत पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्जावर सर्वाधिक व्याजदर असतो. त्यामुळे मोठी गरज असते आणि दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसतो तेव्हाच वैयक्तिक कर्ज घेतले पाहिजे. वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी ग्राहकाने वेगवेगळ्या बँकांच्या ऑफर्सची तुलना करावी. सर्वात कमी व्याजदर असलेल्या बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेतले पाहिजे.

तथापि छोट-छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी आजच्या काळात पर्सनल लोनचा (वैयक्तिक कर्ज) ट्रेंड खूप वाढला आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर कोणतीही बँक तुम्हाला पर्सनल लोन सहज देईल. वैयक्तिक कर्जात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्याजदर. तुमच्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर जितका कमी असेल तितके तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळू शकते. हे चांगले मानले जाते कारण यासाठी तुम्हाला किमान व्याज द्यावे लागेल. जर तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला अशा पाच बँकांबद्दल सांगत आहोत जिथे सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज उपलब्ध आहे.

FD मुदतीआधी मोडायचीय? जाणून घ्या किती भरावा लागेल दंड, प्री-मॅच्युअर पैसे काढण्याचे नियम
बँक ऑफ महाराष्ट्र
बँक ऑफ महाराष्ट्रचा २० लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर १०% किंवा त्याहून अधिक व्याज दर असून कर्जाचा कालावधी ८४ महिन्यांचा असेल.

पंजाब आणि सिंध बँक
पंजाब अँड सिंध बँक तीन लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर १०.१५ टक्के ते १२.८०% व्याजदर आकारत आहे. कर्जाचा कालावधी ६० महिन्यांपर्यंत आहे.

RBI New Rule: आरबीआयने बदलले नियम, आता पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोन मिळणे कठीण होणार
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडियाचा २० लाखांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर १०.२५ किंवा त्याहून अधिक व्याजदर असून कर्जाचा कालावधी ८४ महिन्यांपर्यंत आहे.

Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांनी डिसेंबरपासून १३ दिवस बंदची हाक, ग्राहकांवर होणार थेट परिणाम; नोट करा तारखा
इंडसइंड बँक
इंडसइंड बँक ३० हजार किंवा त्याहून अधिक आणि २५ लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर १०.२५% ते ३२.०२ टक्के व्याज आकारत आहे.

Read Latest Business News

बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदाच्या ५० हजार ते २० लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जाचा दर १०.३५% ते १७.५० टक्के असेल तर कर्जाचा कालावधी ४८ ते ६० महिन्यांपर्यंत आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *