[ad_1]

हैदराबाद: आयआयटीच्या एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. वसतिगृहात तिनं गळफास घेतला. दोन आठवड्यांपूर्वीच ती विद्यापीठात अभ्यासासाठी पोहोचली होती. वसतिगृहातील तिच्या खोलीत दोन नोट सापडल्या आहेत. त्यातील एक इंग्रजी भाषेतील, तर दुसरी ओडिशाच्या स्थानिक भाषेतील आहे. आत्महत्येसाठी तिनं स्वत:लाच जबाबदार धरलं आहे.ओडिशाची रहिवासी असलेली ममता नायक (२१) आयआयटी हैदराबादमध्ये एमटेकची विद्यार्थिनी होती. गेल्या काही दिवसांपासून ती तणावाखाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरील तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली. ममतानं २७ जुलैला विद्यापीठात प्रवेश घेतला होता. ती मूळची ओडिशाची होती. तिच्या खोलीत दोन सुसाईड नोट सापडल्या आहेत. एक ओडिशा भाषेत असून दुसरी इंग्रजीत आहे. तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं तिनं चिठ्ठीत नमूद केलं आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगारेड्डी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून तपास सुरू आहे.सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?कृपया माझा मृतदेह सार्वजनिकरित्या दाखवू नये. माझ्या मृत्यू प्रकरणात कोणत्याही तपासाची गरज नाही. माझ्या मृत्यूला पूर्णत: मीच जबाबदार आहे. कारण मी तणावाखाली होते, असं ममतानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. ममताचा मृतदेह सोमवारी (७ ऑगस्ट) रात्री १० च्या सुमारास आढळला. वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनी ममताला गळफास घेतलेल्या स्थितीत पाहिलं. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *