[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, पुणे: भूतकाळात केलेल्या चुका वर्तमानात आणि भविष्यात घडू नयेत, हे कळण्यासाठी इतिहास वाचावा लागतो. मात्र, महाराष्ट्र आपला इतिहास जातीपातीतून पाहतो. त्यामुळेच इथले महापुरूष आपल्या रक्तात भिनण्याऐवजी जातीपातीचे राजकारणच आपल्यात भिनले आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केले. राज यांनी पक्षातर्फे मंडळाला २५ लाख रूपयांच्या देणगीचा धनादेशही सुपूर्द केला. मंडळातर्फे शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंच्या पत्रांची प्रत, थोरले बाजीराव पेशवे यांचे चित्र आणि काही पुस्तके राज यांना भेट देण्यात आली.

राज ठाकरे यांनी शनिवारी सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळाला भेट देऊन तेथील ग्रंथसंपदा व दस्ताऐवजांची तसेच मंडळाच्या पुनर्विकासाची माहिती घेतली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, या सह पक्षाचे पुण्यातील नेते या वेळी उपस्थित होते.

महाराष्ट्राकडे हजारो वर्षांचा इतिहास आहे. बाकीच्यांकडे भूगोल आहे. भारत इतिहास संशोधक मंडळातील ऐतिहासिक ठेवा अनमोल आहे. प्रत्येकाने हा ठेवा आपल्या नजरेखालून घातला पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. मंडळाला भेट देण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा आज पूर्ण झाली. पण मी यानंतरही पुन्हा येथे येईन,असेही ठाकरे म्हणाले.

बाबरीची वीट मंडळाकडे

१९९२ साली बाबरी मशीद पाडली गेली, त्यावेळी शिवसेनेते असलेले बाळा नांदगावकर कारसेवेसाठी गेले होते. त्यांनी येताना बाबरीची वीट सोबत आणली होती. तिथे राम मंदिर उभे राहिल्यानंतर ही वीट त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली. या विटेवरही संशोधन व्हावे, त्या वेळच्या बांधकामाचा अभ्यास व्हावा, यासाठी राज ठाकरे यांनी ही वीट भारत इतिहास संशोधक मंडळाकडे सुपूर्द केली. दरम्यान, ही वीट आजही सुस्थितीत असल्याचा दाखला देत त्या वेळी बांधकामासाठी निविदा निघत नसत, त्यामुळे बांधकामे चांगली होती, असा टोलाही राज यांनी लगावला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *