[ad_1]

मुंबई : आर्थिक वर्ष २०२४-२५ सुरू झाले आहे आणि नव्या वर्षासाठी आर्थिक आणि टॅक्सचे (कर) नियोजन करायचे असेल तर आताची वेळ खूपच चांगली आहे. टॅक्स वाचवण्यासाठी बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यापैकी सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी किंवा PPF (पब्लिक प्रॉव्हिडंड फंड) अत्यंत लोकप्रिय योजना आहे.पीपीएफ योजनेत कर बचतीसह आकर्षक व्याजदराचाही लाभ मिळतो. परंतु पीपीएफ गुंतवणूकदारांसाठी महिन्याची ५ तारीख खूप महत्त्वाची असते तर ही तारीख चुकल्यास गुंतवणूकदारांचे लाखोंचे नुकसान होऊ शकते. तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यात वर्षातून एकदा पैसे जमा करा किंवा दर महिन्याला नियमित गुंतवणूक करा, दोन्हीच्या बाबतीत ५ तारीख खूपच महत्त्वाची आहे. यामागचं कारण काय ते समजून घेऊया…
Small Saving Scheme: छोट्या बचत योजनांसाठी नवीन व्याजदर जाहीर, जाणून घ्या काय झाले बदल
५ एप्रिलपर्यंत PPF मध्ये गुंतवणूक करा
प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला ५ तारखेपर्यंत पीपीएफ योजनेत एकरकमी पैसे गुंतवले तर सर्वाधिक व्याजदराचा लाभ मिळेल. पीपीएफ खात्यात दर महिन्याच्या ५ तारखेला व्याज मोजले जाते त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत एकरकमी रक्कम जमा केली तर तुम्हाला संपूर्ण महिन्यासाठी व्याजाचा लाभ मिळेल.

सोप्या शब्दात बोलायचे तर पीपीएफ खात्यात ५ एप्रिलपूर्वी गुंतवणूक केल्यास संपूर्ण रकमेवर अधिक व्याजाचा लाभ मिळतो तर, ६ एप्रिलला तेवढीच रक्कम जमा केल्यास कमी व्याज मिळेलं. तसेच एकाच वेळी संपूर्ण वर्षासाठी गुंतवणूक केली तर एक महिन्याच्या व्याजाइतके नुकसान सहन करावे लागते आणि दर महिन्याला गुंतवणूक केल्यासही तोटा सहन करावा लागेल. कारण, PPF योजनेच्या नियमांनुसार खात्यातील व्याज दर महिन्याच्या ५ तारखेपासून ते महिन्याच्या अखेरीस खात्यातील सर्वात कमी शिल्लक रकमेच्या आधारावर मोजले जाते.
Salary Saving: पगार येतो पण पैसा पुरत नाही? मग हा प्लॅन येईल उपयोगी, भविष्यातील आर्थिक चणचण होईल दूर
पीपीएफ गुंतवणुकीवर व्याजाचे गणित
PPF योजनेत सध्या ७.१ टक्के व्याज दिले जात असून जर एखाद्या व्यक्तीने महिन्याच्या ५ तारखेपर्यंत गुंतवणूक केली तर जमा रकमेवर पूर्ण व्याजाचा लाभ मिळतो. त्याचवेळी ५ तारखेनंतर गुंतवणूक केल्यास फक्त ५ ते ३० तारखेदरम्यान सर्वात कमी शिल्लकवर व्याजाचा लाभ मिळेल. अशा परिस्थितीत त्या महिन्यातील व्याजाचे नुकसान होऊ शकते.
आर्थिक सुरक्षेचा सुवर्णमार्ग : सोन्यात प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक
PPF कॅल्क्युलेटरनुसार या आर्थिक वर्षात ५ एप्रिलपर्यंत एकरकमी १.५० लाख रुपये खात्यात जमा केले आणि १५ वर्षे गुंतवणूक सुरू ठेवली, तर १५ वर्षांत जमा रकमेवर एकूण १८.१८ लाख रुपये व्याज मिळेल. त्याच वेळी, प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेनंतर पीपीएफमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला फक्त १७.९५ लाख रुपये व्याज मिळेल. अशाप्रकारे १५ वर्षांत २३,१८८ रुपयांच्या व्याजाचे नुकसान होईल.

Read Latest Business News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *