[ad_1]

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या घटक पक्षांची बैठक मंगळवारी बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीकडे महायुतीचे संभाव्य उमेदवार – राज्यसभा खासदार उदयनराजे यांनीच पाठ फिरवली. बैठकस्थानी येऊनही ते बैठकीला थांबले नाहीत. ‘अखेर महत्त्वाच्या बैठका होत्या, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते,’ अशी सारवासारव पालकमंत्री शंभुराज देसाई यांना करावी लागली.

महायुतीतील घटक पक्षांची पहिली महत्त्वपूर्ण बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आयोजित करण्यात आली होती.

या वेळी सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भेासले, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, अमित कदम, विक्रमबाबा पाटणकर, चंद्रकांत पाटील, सुरभी भोसले, शारदा जाधव, अशोक गायकवाड, सुनील काटकर, पंकज चव्हाण, काका धुमाळ, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार उपस्थित होते.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी फायनल, ज्योती मेटे ‘सिल्व्हर ओक’ला, पाच संभाव्य उमेदवार कोण?
या मतदारसंघातून इच्छुक असलेले खासदार उदयनराजे मात्र बैठकीला थांबले नाहीत. वाईचे आमदार मकरंद पाटील अनुपस्थित होते. याबाबत विचारले असता देसाई म्हणाले, ‘खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार मकरंद पाटील यांना महत्त्वाच्या बैठका होत्या. उदयनराजे या ठिकाणी येऊन गेले; तसेच त्यांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. त्यांच्याशी फोनवरून चर्चा झाली.’

‘रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा मिळेपर्यंत, आमच्या मागण्यांचा निर्णय होईपर्यंत तटस्थ राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,’ असे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी सांगितले.
किरणभैयांची भावनेच्या भरात ‘माघार’ पोस्ट, समजुतीनंतर डिलीट; रत्नागिरीवर शिवसेनेचा दावा काय, उदय सामंत ठाम
सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आठ एप्रिलपासून विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे घेतले जातील. सातारा, कराड, वाई येथे घटक पक्षांचे कार्यकर्ते मेळावे घेतले जाणार आहेत.
– शंभुराज देसाई, पालकमंत्री
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

‘निदान डोळा तरी मारा’

खासदार उदयनराजे भोसले बैठकीच्या ठिकाणी शेतकऱ्याच्या वेशात आले होते; पण बैठकीस येण्यास पदाधिकाऱ्यांना उशीर झाल्याने थोडा वेळ थांबून ते बाहेर पडले. उदयनराजेंचा पेहराव हटके होता. त्यावरून त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘माझा लुक चांगला असल्याने निदान डोळा तरी मारा; पण मी डोळा मारला तर त्याचा वेगळा अर्थ घेतला जाईल,’ अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *