[ad_1]

नवी दिल्ली: भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाल्यामुळे त्याची कसोटी क्रिकेटमधील निराशाजनक कामगिरी कायम राहिली. २०२३ च्या चमकदार कामगिरीसाठी नुकताच बीसीसीआय क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार पटकावणाऱ्या या खेळाडूने संघात राहावे का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. अनिल कुंबळेंनी सुध्दा या मुद्द्यावर मोठे वक्तव्य केले आहे, वाचा नेमकं काय म्हणाले.

शुभमन गिलला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. १९० धावांची आघाडी असतानाही भारताला २८ धावांच्या मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना गिलने केवळ २३ धावा केल्या. दुसऱ्या डावात अवघ्या दोन चेंडूंचा सामना केल्यानंतर तो शून्यावर आऊट झाल्याने त्याचा संघर्ष आणखी वाढला. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि सुप्रसिद्ध फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी खराब कामगिरी करूनही गिलला संघात कायम ठेवण्याच्या निर्णयावर टीका केली. तो म्हणाला की कसोटीपटू चेतेश्वर पुजारालाही व्यवस्थापनाकडून असे सातत्यपूर्ण सहकार्य मिळालेले नाही.

स्पोर्ट्स 18 शो मॅच सेंटर लाइव्हवर बोलताना कुंबळे म्हणाले, “पुजाराला १०० हून अधिक कसोटी सामन्यांचा मोठा अनुभव असूनही, गिलला चेतेश्वर पुजारापेक्षाही अधिक पाठिंबा मिळाला आहे. मी पुजारावर भर देतो कारण तो खूप पूर्वी त्याच स्थितीत होता. पुजारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळला आणि त्यानंतर शुभमन गिल त्याच स्थानावर खेळत आहे”

गिलला त्याच्या मानसिकतेवर काम करावे लागेल आणि त्याची टेक्निकही त्यावी सुधारावी लागेल, असे कुंबळेंनी सांगितले. ते म्हणाले, “जर भारतीय संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल, तर तुम्हाला तुमच्या टेक्निकवर काम करावे लागेल. त्याच्याकडे कौशल्य आहे आणि तो युवा आहे, तो शिकत आहे, पण त्याला दुसऱ्या कसोटीत चांगले खेळावे लागेल अन्यथा त्याच्यावर अधिक दबाव येईल.”

पण पुढच्या कसोटीच्या चार दिवस आधी तो आपली खेळण्याची शैली बदलू शकेल का असे विचारले असता कुंबळे म्हणाले, “ही मानसिकतेची बाब आहे. प्रशिक्षक (राहुल द्रविड) याच्या रूपात त्याला सांगण्यासाठी त्याच्याकडे सर्वोत्तम व्यक्ती आहे. भारतीय फलंदाजांना फिरकीसमोर अधिक चांगले खेळावे लागेल. काही फलंदाजांचा दृष्टिकोन सकारात्मक नव्हता आणि फूटवर्कही खराब होते.”

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *