[ad_1]

पुणे : पुण्यातील कोंढवा बुद्रुक स्मशानभूमी जवळ विचित्र अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये शाळेच्या बसचा देखील समावेश आहे. यामुळे सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे.

कात्रज कोंढवा खडी मशिन रोडवर सकाळच्या सुमारास एक विचित्र अपघात झाला आहे. यात अनेक वाहनांनी एकमेकांना धडक दिली आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

चालकाचं नियंत्रण सुटलं, जालना-पुसद बस कोसळली; २२ प्रवासी जखमी

कात्रज कोंढवा रोड हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावर अपघातांचं सत्र हे सुरुच आहे. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *