[ad_1]

नवी दिल्ली: आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या (RBI MPC Meeting) बैठकीत यूपीआयशी संबंधित मोठे निर्णयही घेण्यात आले आहेत. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आपल्या निवेदनात याबाबत माहिती दिली. RBI ने UPI Lite वरील व्यवहार मर्यादा वाढवली आहे. त्याचबरोबर लवकरच ऑफलाइन पेमेंटची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे. RBI गव्हर्नरने UPI पेमेंट वाढवण्यासाठी अनेक उपायांची घोषणा केली आहे.

यामध्ये UPI Lite वरील व्यवहार मर्यादा २०० रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत वाढवणे समाविष्ट केले आहे. लवकरच यूपीआयच्या माध्यमातून ऑफलाइन पेमेंटची सुविधाही आणली जाईल, असेही दास म्हणाले. यासोबतच UPI प्लॅटफॉर्मवर कन्वर्सेशनल पेमेंट्स ची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे.

ट्रांजेक्शन लिमिटमध्ये वाढ

अशाप्रकारे, RBI च्या या MPC बैठकीत UPI शी संबंधित तीन घोषणा झाल्या आहेत. प्रथम, कन्वर्सेशनल पेमेंट्सची सुविधा UPI वर सुरू केली जाईल. UPI वर ऑफलाइन पेमेंटची सुविधा असेल. तर तिसरी घोषणा आहे- UPI Lite वरील व्यवहार मर्यादा २०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आली आहे.

महागाई ५.४ टक्के राहण्याची शक्यता

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, २०२३-२४ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई म्हणजेच किरकोळ महागाई ५.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत किरकोळ चलनवाढीचा दर ६.२ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ५.७ टक्के, चौथ्या तिमाहीत ५.२ टक्के आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत ५.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे.

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, भारतीय रुपया जानेवारी २०२३ पासून स्थिर आहे. ते म्हणाले की, भारताच्या परकीय चलनाचा साठा ६०० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *