[ad_1]

अमरावती: ट्रेनमधून एकाला अटक करण्यात आली आहे. ट्रेनच्या शौचालयात बसून तो धूम्रपान करत होता. विडीच्या धुरामुळे फायर अलार्म वाजू लागला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. प्रवासी घाबरले. काही वेळातच ट्रेनमधील फायर अलार्म वाजण्यामागचं कारण समोर आलं. आरोपी तिरुपती-सिकंदराबाद ट्रेनच्या शौचालयात बसून विडी फुंकत होता. आरोपी तिरुपती स्थानकातून ट्रेनमध्ये चढला. त्यानंतर तो थेट सी-१३ कोचच्या शौचालयात शिरला. तिथे बसून त्यानं विडी पेटवली. विडी पेटताच धूर पसरला. त्यामुळे एरोसोल फायर एक्सटिंग्युशर यंत्रणा सक्रिय झाली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ट्रेनच्या केबिनमध्ये सर्वत्र धूर पसरलेला दिसत आहे. प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे. रेल्वेच्या डब्यात धूर पसरताच रेल्वे कर्मचारी अलर्ट झाले. धूर नेमका कुठून येतोय याचा शोध त्यांनी सुरू केला. एका शौचालयातून धूर येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. शौचालयाचं दार उघडताच त्यांना एक प्रवासी दिसला. त्याच्याकडे तिकीट नव्हतं. त्यानं जळती विडी कचऱ्यात फेकली. त्यामुळे कचरा पेटीतील प्लास्टिकला आग लागली आणि धूर पसरला. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. आरोपी प्रवाशाला नेल्लोरमध्ये रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं. रेल्वेच्या नियमांनुसार त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. आरोपी विनातिकिट प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे ट्रेनला अर्धा तास उशीर झाला. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो ३२ हजारांहून अधिक जणांनी पाहिला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *