विशाखापट्टणम : कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. यावेळी रोहित शर्माने सामना सुरु असताना भर मैदानात शिवी दिल्याचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.रोहित हा तसा शांत कर्णधार आहे. पण रोहितचा जेव्हा पारा चढतो तेव्हा तो कसलीही तमा बाळगत नाही आणि मनात असेल ते बोलून तो मोकळा होतो. अशीच एक गोष्ट इंग्लंडविरुद्धच्या या कसोटीत दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाली. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा दिसत नाही, तर इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो दिसत आहे. पण रोहित शर्माचा आवाज मात्र स्पष्ट ऐकायला येत आहे. ही गोष्ट ३१ व्या षटकानंतर घडल्याचे पाहायला मिळत आहे. भारतासाठी ३१ वे षटक फिरकी गोलंदाज कुलदीप यादव टाकत होता. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बेअरस्टोने चौकार वसूल केला होता. त्यानंतर चार चेंडू निर्धाव गेले आणि सहाव्या चेंडूवर त्याने एक धाव काढली. हे षटक संपले आणि इंग्लंडचे दोन्ही फलंदाज बोलण्यासाठी जवळ आले. त्यावेळी भारताचे खेळाडू हे क्षेत्ररक्षणासाठी एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जात होते. त्यावेळी काही खेळाडू हे आळसावल्याचे दिसत होते आणि त्यामुळे रोहित शर्मा भडकला, असे म्हटले जात आहे. कारण रोहितच्या बोलण्यावरून तर हाच अंदाज बांधला जात आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा म्हणाला की, ” भेंंxx, कोई भी गार्डन में घुमेगा तो x xx xx में उसका…” रोहित शर्माचे हे शिवराळ बोलणे ऐकून तो भारताच्या खेळाडूंनाच बोलत असल्याचे स्पष्ट होत आहे. काही खेळाडू गार्डनमध्ये फिरायला येतात तसे कदाचित चालत असतील आणि त्यांना उद्देशून रोहित शर्मा हे बोलला असल्याचे कयास लावले जात आहेत. यापूर्वीही इशान किशनने, रोहित मैदानात शिव्या देतो, असे म्हटले होते. पण शिव्या दिल्यावर रोहित त्या खेळाडूची माफीही मागतो, हे सांगायला इशान विसरला नव्हता. रोहित शर्मा हा एक कुशल कर्णधार आहे. रोहितने आतापर्यंत संघाची उत्तम बांधणी केल्याचे समोर येत आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. आतापर्यंत या मालिकेत रोहित शर्माला लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळे रोहित आता रविवारी कशी फलंदाजी करतो, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *