न्यूझीलंड संघाच्या ताफ्यात असा एक गोलंदाज आहे जो भारतासाठी बोल्टपेक्षाही धोकादायक ठरू शकतो. किवी संघाकडे असा गोलंदाज आहे ज्याने ११ वेळा रोहित शर्मा आणि १० वेळा विराट कोहलीला बाद केले आहे. तो गोलंदाज इतर कोणी नसून अनुभवी टीम साऊदी आहे. टीम साऊदी हा जगातील सर्वोत्तम स्विंग गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्याकडे चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची क्षमता आहे.
रोहित शर्मा
टीम साऊदीने भारतीय कर्णधार रोहित शर्माला कसोटीत २ वेळा, एकदिवसीय सामन्यात ५ वेळा आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४ वेळा बाद केले आहे. रोहितला साऊदीविरुद्ध कधीही उघडपणे खेळता आलेले नाही. एकदिवसीय सामन्यात साऊदीविरुद्ध रोहितची सरासरी २१ आहे आणि स्ट्राईक रेट फक्त ७० आहे. रोहितने खेळण्याचा दृष्टिकोन बदलला आहे पण सौदीकडे ३५० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे.
विराट कोहली
टीम साऊदीविरुद्ध विराट कोहलीचा रेकॉर्ड रोहित शर्मापेक्षा सरस आहे. पण तोही साऊदीच्या जाळ्यात अडकत चालला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६ वेळा विराटला बाद करणारा गोलंदाज टीम साऊदी देखील आहे. मात्र, विराटने त्याच्याविरुद्ध १०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावाही केल्या आहेत. मात्र मुंबईत पहिल्या १० षटकांत विराट क्रीजवर आला तर त्याला साऊदीविरुद्ध अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
टीम साऊदी सुरुवातीला विश्वचषकातील काही सामने खेळला नव्हता. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी साऊदीला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान क्षेत्ररक्षण करताना उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यानंतर त्याच्या मेगा इव्हेंटमध्ये खेळण्याबाबत शंका ही व्यक्त केली जात होती. मात्र, शस्त्रक्रियेनंतर तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आणि त्यानंतर तो न्यूझीलंड संघात परतला आहे.