[ad_1]

सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. प्रणिती शिंदे यांनी मुद्याच बोला ओ, या अभियाना अंतर्गत भाजप आणि राम सातपुते यांच्यासमोर सवाल उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी सुशीलकुमार शिंदे यांना टोला लागवत तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होता, राज्यपाल होता, केंद्रात ऊर्जा मंत्री, गृहमंत्री या पदावर होता. तर तुम्ही सोलापूरसाठी काय केलं? असा सवाल विचारला आहे.राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरु केल्या आहे. एकीकडे कॉंग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी १० वर्षात भाजप खासदार काहीही करू शकले नाही, असा आरोप केला आहे. तर राम सातपुते हे सुशीलकुमार शिंदेंवर आरोप करत तुम्ही काय केलात असा सवाल उपस्थित करत सोलापूरकरांना आवाहन करत आहे. सोलापूरची जनता मात्र दोन्ही नेत्यांकडे विकासासाठी अपेक्षेने पाहत आहे.
भाजपचे बंडखोर नारायणराव गव्हाणकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल, अनुप धोत्रेंना फटका बसण्याची शक्यतासोलापूर शहर आणि जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना बुधवारी जाहीर पाठिंबा देण्यात आला. राम सातपुते यांना टक्कर देण्यासाठी किंवा तोडीस तोड देण्यासाठी प्रणिती शिंदेनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात नवं अभियान सुरू केले आहे. “मुद्द्याच बोला ओ”. मागील दहा वर्षांपासून सोलापूर लोकसभा मतदारसंघात असलेल्या खासदारांनी सोलापूरसाठी काय केले असे भाजपला आवाहन करत प्रणिती शिंदे यांनी मुद्द्याच बोला ओ असा सवाल उपस्थित केला आहे. अभियाना अंतर्गत राम सातपुते यांना देखील आमदार प्रणिती शिंदे यांनी अप्रत्यक्ष पणे प्रश्न विचारले आहे.

प्रणिती शिंदे यांनी मुद्द्याचं बोला ओ या अभियानांतर्गत विरोधी पक्षाच्या उमेदवारांना सोलापुरातील विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यास भाग पाडणार असल्याचे स्पष्ट केले. मागील दहा वर्षात भाजपने आणि त्यांच्या सोलापुरातील खासदारांनी आश्वासनाव्यतिरिक्त काहीच दिले नाही. यातून मतदारांची फसवणूक झाली आहे. आता त्यांच्याकडे विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासारखं काही उरलं नाही म्हणूनच ते विषयांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

चौरंगी लढतीत जिंकण्याचा आनंद वेगळा, राजू शेट्टी जिंकतीलच!; कार्यकर्त्यांना विश्वास

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते हे ही प्रचाराच्या धुराळ्यात सुसाट सुटले आहेत. राम सातपुते शिंदे परिवाराला माध्यमांमधून आणि भाषणातून विचारत आहेत. सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. आंध्रप्रदेशचे राज्यपाल होते. केंद्रात ऊर्जामंत्री होते, गृहमंत्री होते. तुम्ही सोलापूरच्या विकासासाठी काय केलंत. आजतागायत सोलापूरला विमानसेवा सुरू करू शकले नाहीत, सोलापूरकरांना आजही पाच दिवसांआड पाणी मिळतं. सोलापूर शहरातून जड वाहतूक रोखू शकले नाहीत. मागील दहा वर्षांत भाजपच्या दोन खासदारांनी आणि केंद्रातील मोदी सरकारने सोलापुरात काय केलं ते सांगण्यासाठी कोणत्याही चौकात यायला तयार आहेत. तुम्ही सोलापूरच्या विकासासाठी काय केलं त्या प्रश्नांची उत्तरे अगोदर द्या असं सांगत राम सातपुते टीकास्त्र डागलं.

१० वर्षात भाजप खासदार काहीही करू शकले नाहीत. पाण्याची पाईपलाईन आणू शकले नाहीत. ना रोजगार आणू शकले. ना साधी विमान सेवा सुरु करू शकले, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी भाजपावर केली आहे. आता याला भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी उत्तर दिलं आहे. ऑगस्ट महिन्यात सोलापुरातून विमानतळ सुरु होईल. त्यासाठी मी मोदीजींजवळ जाऊन बसेन पण विमानतळ सुरु करेन हा माझा शब्द आहे. पुढील पाच वर्षात सोलापूरला २५ वर्षे पुढे नेईल हा शब्द देतो. विमानतळ सुरू झाल्यानंतर सोलापूरकरांसाठी उत्तम प्रकारचं आयटी पार्क उभं करणार, असं म्हणत राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांच्या टिकेला उत्तर दिलं आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *