[ad_1]

नवी दिल्ली : केकेआरने दिल्ली कॅपिटल्सवर मोठा विजय साकारला. पण केकेआरच्या विजयापेक्षा एका व्यक्तीची सर्वात जोरदार चर्चा सुरु आहे. केकेआरचा मालक शाहरुख खानबरोबर एक सुंदरी पाहायला मिळत होती. ही सुंदरी नेमकी आहे तरी कोण, याची चर्चा जोरदार रंगत आहे.

या सामन्यासाठी आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी शाहरुख खानही विशाखापट्टणमला पोहोचला होता. शाहरुख खान हा फक्त सुपरस्टार नाही तर तो एक क्रिकेटप्रेमी देखील आहे. बॉलीवूडमधील बादशाह म्हणून त्याची प्रशंसा केली जात असते. गेल्या काही दिवसांपासून तो चांगलाच चर्चेत आहे. हा सामना झाल्यावर शाहरुखने संघातील खेळाडूंची भेट घेतली आणि त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. पण हा सामना सुरु असताना शाहरुखच्या बाजूला नेमकी कोण बसली होती, याची जोरदार चर्चा सुरु आहे. पण ही सुंदरी आहे तरी कोण, हे आता समोर आले आहे.

शाहरुख हा सामना पाहत असताना आपल्या शेजारी बसलेल्याा सुंदर मुलीशी वारंवार बोलत होता. ती सुंदरीही त्याला काही गोष्टी सांगत होती. शाहरुखच्या एवढ्या जवळ असलेली ही सुंदरी कोण, याचा उलगडा सामना सुरु झाल्यावर काही वेळाने झाला. शाहरुखच्या बाजूला बसली होती ती त्याची मॅनेजर पूजा ददलानी. पूजा ददलानी गेल्या १२ वर्षांपासून शाहरुख खानसोबत काम करत आहे. मॅनेजरच्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन ती त्याच्या कुटुंंबातील एक व्यक्ती बनली आहे. पूजा ददलानीशिवाय शाहरुख खान कोणताही मोठा निर्णय घेत नाही.

पूजा आणि शाहरुख खानचा प्रवास २०१२ मध्ये मुंबईत सुरू झाला. ती शाहरुखप्रमाणेच मास कम्युनिकेशन ग्रॅज्युएट आहे. तिने कमी वयातच तिची कारकीर्द सुरू केली. त्यामुळे पूजाच्या गाठिशी दांडगा अनुभव आहे. त्यामुळेच शाहरुख सारख्या व्यस्त अभिनेत्याचे काम ती चोख करताना दिसत आहे. पूजा फक्त शाहरुखची मॅनेजर नाहीतर आयपीएलमधील रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि कोलकाता नाइट रायडर्स संघासह त्याच्या व्यावसायिक उपक्रमांवर देखरेख करण्यासाठीही ओळखली जाते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर पूजा ददलानीने हितेश गुरनानीसोबत लग्न केले आहे. २००८ मध्ये या दोघांनी लग्न केले आणि रिपोर्ट्सनुसार, पूजा ददलानीचा पगार ७-८ कोटी रुपये आहे. शाहरुख खानसोबत पूजाचाही वाढदिवस २ नोव्हेंबरला असतो. शाहरुख खानचे इन्स्टाग्रामवर जवळपास ४७ मिलियन फॉलोअर्स आहेत. पण तो स्वत: फक्त ६ लोकांना फॉलो करतो, यात पूजा ददलानीदेखील आहे.

वानखेडेवर शर्मा गटाची हद्द, मांजरेकरांनी खडसावलं, पंड्याची अवस्था पाहून रोहितने काय केलं?

ऑक्टोबर २०२१ मध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. या ड्रग्ज प्रकरणाच्या सुनावणीला शाहरुख आणि गौरी कमी आणि पूजा कोर्टाबाहेर जास्त दिसली. शाहरुख खानसाठी पूजा ददलानी व्यवस्थापक म्हणून नाही तर खान कुटुंबातील एक लाडकी सदस्य असल्याचेच पाहायला मिळत आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *