[ad_1]

मुंबई- मोठ्यांनी लहानांना त्रास देणे ही गोष्ट पूर्वापारपासून चालत आलेली आहे. मग ही गोष्ट घरातल्या भावंडांमध्ये होते. शाळा कॉलेजातल्या मित्रमैत्रीणींमध्ये होते. किंवा कामावरच्या सहकाऱ्यांमध्येही होते. एवढेच काय तर टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांसोबतही या गोष्टी सर्रास घडत असतात.

ज्येष्ठ कलाकाराकडून नवख्या कलाकारांचा अपमान अशा बातम्या आपल्याला अनेकदा ऐकायला मिळतात. आता अशीच घटना मराठी टेलिव्हिजन विश्वात काम करणाऱ्या अभिनेत्रीसोबतसुद्धा घडल्याचे समोर आले आहे.

मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री सई रानडेसोबत असे घडलेले. सईने बहुतांशी खलनायिकेचे पात्र टीव्हीवर रंगवले. त्यामुळे प्रेक्षकांनी तिचा खूप रागराग केला. पण त्यांच्या त्या रागातूनच सईला तिच्या कामाची पावती देखील मिळत असते. याशिवाय सई माहोल मुली या ग्रुपसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. या ग्रुपमध्ये त्या मराठी शब्दांना पर्यायी वऱ्हाडी शब्द कोणते हे सांगतात. या मोहोल ग्रुपचे रील्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात.

स्टार किड असूनही हृतिकला सहन करावं लागलेलं रॅगिंग; ‘कोई मिल गया’च्या रोहितसारखी झालेली अवस्था
याच माहोल ग्रुपने एका युट्युब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत सईने तिला या इंडस्ट्रित रॅगिंगचा कसा सामना करावा लागला हे सांगितले. सई म्हणाली की, “जेव्हा मी सिनेसृष्टीत पदार्पण केले तेव्हा माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या माझ्या सहकलाकारांनी माझी रॅगिंग केलेली. यात भार्गवी चिरमुले नव्हती. पण, या सगळ्याला मी इतकी कंटाळले होते की सिनेसृष्टी सोडून मी पुन्हा पुण्याला जाण्याच्या विचारात होते. त्यावेळी मी डिप्रेशनमध्ये होते”

अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकरशी दिलखुलास गप्पा

“याचा मी इतका धसका घेतला की त्यानंतर मी कोणाशीही मैत्री करायला आले नाही. मी इतकंच ठरवलं होतं की, माझं माझं काम करणार आणि बाजूला होणार. माझ्या ठेवणीतील मित्र-मैत्रिणी वेगळे, माझा नवरा आहे, कुटुंब आहे आणि त्यातच मी खूप आनंदी होते. मी पहिल्यांदा जेव्हा ‘पुढचं पाऊल’ मालिकेच्या सेटवर गेले, तेव्हा तिथे बरीच वर्ष सिनेसृष्टीत काम करणारे कलाकार होते, त्यामुळे या सर्वांसमोर आपल्याला नीट काम करायला हवं. नाहीतर इथेही आपलं रॅगिंग होऊ शकतं असंच मला वाटायचं. भार्गवी चिरमुलेसोबत मी जेव्हा पहिली मालिका केली त्यावेळी इतर सहकलाकारांनी मला खूप त्रास दिला. त्यावेळी मी या सर्वांपासून थोडी लांब राहायचे. तेव्हा मला असं वाटायचं की माझंच सगळं चुकतंय, पण कालांतराने माझी आणि भार्गवीची मैत्री झाली.”

‘ब्रह्मास्त्र’साठी शाहरुखने १ रुपयाही घेतला नव्हता, करण जोहरने सांगितला अभिनेत्याचा दिलदारपणा
सई रानडेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने वहिनीसाहेब, ‘बड्या आनी बेबी’, स्पंदन, पकड़ा पकड़ी आणि लक्ष्मी तुझ्याविना, देवयानी यांसारख्या काही मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *