मुंबई : मुग्धा पार्टे (34 चेंडूत 85 धावा) आणि मुग्धा घोडकेच्या (38 चेंडूत 84) झटपट खेळीच्या जोरावर शारदाश्रम विद्यामंदिर, दादरने एमआय ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत 15 वर्षांखालील मुली गटाच्या साखळी सामन्यात गुरुवारी विलेपार्ले येथील चत्रभुज नरसी मेमोरियल स्कूलवर (सीएनएमएस) 286 धावांनी विजय मिळवला. दोन्ही मुग्धाच्या शानदार अर्धशतकांमुळे शारदाश्रमने 20 षटकांत 6 बाद 325 धावा केल्या. त्यानंतर मधुरा धडकेच्या (४-२) शानदार स्पेलमुळे सीएनएमएस संघ ३९ धावांत बाद झाला.

या गटातील आणखी एका सामन्यात, सलामीवीर गरिमा दोषी (७३ चेंडूत ९२) आणि अनुष्का जाधवमुळे (५५ चेंडूत ६८) सिस्टर निवेदिता स्कूल, डोंबिवलीने एसव्हीकेएम – जेव्ही पारेख इंटरनॅशनल स्कूल, विलेपार्ले संघाविरुद्ध १४ षटकांत ३ बाद २६७ अशी मोठी मजल मारली. प्रत्युतरादाखल जेव्ही पारेख संघ केवळ 128 धावाच करू शकला आणि 139 धावांनी पराभूत झाला.

१६ वर्षांखालील मुले गटाच्या लीग सामन्यात, लक्षधामचा कर्णधार सौरिश देशपांडेने (27 धावांत 6 बळी) प्रभावी गोलंदाजी करताना मदर मेरी इंग्लिश हायस्कूल, नालासोपारा संघाला केवळ 55 धावांवर रोखले. लक्षधाम हायस्कूल, गोरेगावने ४.३ षटकांत विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात, आर्यन बाबरदेसाईने 96 चेंडूत 189 धावा फटकवताना सेंट झेवियर्स बॉईज अकॅडमी, चर्चगेटला 255 धावांपर्यंत मजल मारून दिली. नीवन बारोट (4-52) आणि आयुष डोंगरेने (3-0) ठाकूर श्याम नारायण हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजला 174 धावांवर बाद करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, 14 वर्षांखालील मुलांच्या गटात, जयडेन क्रेडो याने (5-20) होली क्रॉस हायस्कूल, मीरा रोडला 58 धावांत रोखताना चत्रभुज नरसी मेमोरियल स्कूल, विलेपार्लेने मोठा विजय मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी त्यांना 8 षटके पुरेशी ठरली.

संक्षिप्त गुणफलक:

१४ वर्षांखालील मुले:

1. होली क्रॉस हायस्कूल, मीरा रोड – 16.2 षटकांत सर्वबाद 58 (जेडेन क्रेडो 5-20, तनव सेकसारिया 4-12) चत्रभुज नरसी मेमोरियल स्कूल, विलेपार्ले – 8 षटकांत ३ बाद 59. सामनावीर: जेडेन क्रेडो

2. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, कांदिवली – 37.5 षटकात सर्वबाद 244 (शौर्य एन शर्मा 92, सिद्धार्थ यादव 32; अथर्व वडागुळे 3-32, सार्थक पिसे 3-57) विजयी वि. ॲग्नेल मल्टीपर्पज स्कूल – 13.4 षटकांत सर्वबाद 46 (अद्वेद राऊत 4-8). सामनावीर: अद्वेद राऊत

3. व्हीपीएमएस विद्यामंदिर, दहिसर – 40 षटकांत ५ बाद 230(अंश पटेल 79, नीलेश शर्मा 37; देव कावा 3-52) ठाकूर रामनारायण पब्लिक स्कूल, आयसीएसई, दहिसर – 24.1 षटकांत सर्वबाद 58 (आरव घाग 30; सामरी कुमार) -17). सामनावीर: समृद्ध कुमारेश

१५ वर्षांखालील मुली

1. शारदाश्रम विद्यामंदिर, दादर – 20 षटकांत 6 बाद 325 (मुग्धा पार्टे 85, मुग्धा घोडके 84, इरा सचिन जाधव 66) विजयी वि. चत्रभुज नरसी मेमोरियल स्कूल, विलेपार्ले – 8.2 षटकांत सर्वबाद 39 (मधुरा धडके-42).
सामनावीर: मुग्धा पार्टे

2. सिस्टर निवेदिता स्कूल (डोंबिवली) – 14 षटकांत 3 बाद 267(गरिमा दोशी 92, अनुष्का जाधव 68) विजयी वि. एसव्हीकेएम-जे. व्ही. पारेख इंटरनॅशनल स्कूल, विलेपार्ले -14 षटकांत 3 बाद 128(रिया दोशी 81). सामनावीर: गरिमा दोशी

१६ वर्षांखालील मुले –

1. नॅशनल कन्नड एज्युकेशन सोसायटी, वडाळा – 27.1 षटकांत सर्वबाद 83 (सिद्धेश पार्थे 3-6, सिद्धेश अनिल तुंगारे 3-20) पराभूत वि. रिलायन्स फाऊंडेशन स्कूल, लोधीवली – 14.4 षटकांत 2 बाद 85 (सिद्धेश राजेंद्र पार्थे 47*). सामनावीर: सिद्धेश पार्थे.

2. मदर मेरीज इंग्लिश हायस्कूल, नालासोपारा – 17 षटकांत सर्वबाद 55(सौरिश देशपांडे 6-27) पराभूत वि. लक्षधाम हायस्कूल, गोरेगाव – 4.3 षटकांत 2 बाद 58(अहान सुथराम 38). सामनावीर: सौरिश देशपांडे

3. रिझवी स्प्रिंगफील्ड हायस्कूल, सीबीएसई, खारदांडा – 36.3 षटकांत सर्वबाद 109(शुभम यादव 3-18) विजयी वि. आर.व्ही. नेरकर सेकंडरी स्कूल, वसई -15.2 षटकांत 4 बाद 113(स्वेतन 46*, यश पुजारी 41). सामनावीर: स्वेतन.

4. बालमोहन विद्यामंदिर इंग्लिश मीडियम, दादर – 15 षटकांत 6 बाद 46(नूर मोहम्मद 2-6) विजयी वि. अंजुमन-इ-इस्लाम, फोर्ट – 3.3 षटकांत बिनबाद 49(सौरभ चौरसिया 34*). सामनावीर: नूर मोहम्मद

5. रायन इंटरनॅशनल स्कूल, चेंबूर – 23.5 षटकांत सर्वबाद 81(जीत डी. राऊत 2-6) विजयी वि. एन. जी. वर्तक इंग्लिश स्कूल, विरार -14.3 षटकांत 1 बाद 84 (जीत डी. राऊत 41). सामनावीर: जीत डी. राऊत

6. अंजुमन-इ-इस्लाम अल्लाना इंग्लिश स्कूल, वाशी – 40 षटकांत 9 बाद 179 (रमजान शेख 65, उजैफा मोहम्मद खान 56; इशांत के. 6-23) विजयी वि. शारदा मंदिर हायस्कूल, ग्रँट रोड – 23.3 षटकांत सर्वबाद 135 (शाहिद शेख 5-41). सामनावीर: शाहिद शेख

7. नॅशनल इंग्लिश हायस्कूल, विरार – 40 षटकांत 9 बाद 289(आरव सुळे 89, आराध्य 46, आदित्य 45; अमर्त्य राजे 4-44) विजयी वि. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल – 27.3 षटकांत सर्वबाद 102(अमर्त्य राजे 74; आराध्य राजे 44-44) 21). सामनावीर : आरव सुळे

मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद पांड्याला, पुणेकरांच्या प्रतिक्रिया काय?

8. सेंट झेवियर्स बॉईज अकॅडमी, चर्चगेट – 29.4 षटकांत सर्वबाद 255(आर्यन बाबरदेसाई 189) विजयी वि. ठाकूर श्याम नारायण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज – 24.2 षटकांत सर्वबाद 174(आयुष सिंग 78; नीवन बरोट 4-52, आयुष डोंगरे 3-0). सामनावीर: आर्यन बाबरदेसाईSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *