[ad_1]

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना अश्लील शिवीगाळ केल्याचं प्रकरण राज्यात चांगलंच गाजत आहे. त्यानंतर किशोर पाटील समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप पत्रकाराने केला आहे. याच प्रकरणावरून किशोर पाटील यांची बहीण आणि ठाकरे गटातील नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

किशोर पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार आहेत. सेनेतील फुटीनंतर पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. तर त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी मात्र ठाकरेंच्या पाठीशी ठाम राहिल्या. राजकीय मैदानात एकमेकांच्या आमनेसामने असलेली ही भावंडं कौटुंबिक समारंभांना मात्र एकत्र दिसत. परंतु पाटील यांच्या समर्थकांनी पत्रकाराला मारहाण केल्याचा आरोप झाल्याने आता वैशाली सुर्यवंशी भडकल्या असून त्यांनी भावाचे कान उपटले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील एका गावातील पीडित मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबाशी संवाद साधला. या विषयावर पाचोरा येथील स्थानिक पत्रकार संदीप महाजन या पत्रकाराने ‘मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी’ या आशयाखाली बातमी प्रसारित केली होती.

हरिश्चंद्र गडावर वाट चुकलेल्या पर्यटकाचा मृत्यू नेमका कशामुळे, अंगावर काटा आणणारं कारण समोर
याच घटनेवरून आमदार किशोर पाटील आणि संबंधित पत्रकार यांच्याशी फोनवरून एकमेकांमध्ये संवाद झाला. याच संवादात बोलताना आमदार किशोर पाटील यांनी पत्रकाराला अश्लील शिवीगाळ केली असून हीच ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी ती ऑडिओ क्लिप माझीच आहे, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मी जे केलं ते सत्य सांगण्याची माझ्यामध्ये हिंमत आहे, असे म्हणत ‘घटने संदर्भात संबंधित पत्रकाराला गांभीर्य नसेल तर…. होय मी पत्रकाराला शिव्या दिल्या आहेत’ अशी सुद्धा कबुली दिली होती. या प्रकरणावरून आमदार किशोर पाटील यांच्यावर राज्यभरातून टीका होताना पाहायला मिळत आहे.

पत्रकाराची बातमी झोंबली, आधी शिवीगाळ, आता समर्थकांकडून मारहाण, शिंदे गटाच्या आमदाराची दादागिरी

काय म्हणाल्या वैशाली सुर्यवंशी?

याच प्रकरणावरून आता आमदार किशोर पाटील यांच्यावर संताप व्यक्त करत त्यांच्या चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी खडे बोल सुनावले आहेत. एखाद्या आमदाराने पत्रकारच काय पण जनतेतील कुठल्याही व्यक्तीशी अशा पद्धतीने बोलू नये. पाचोराचा राजकीय वारसा सुसंस्कृत आहे. यापूर्वीच्या नेत्यांनी तो कायम ठेवला आणि तो आताच्या नेत्यांनीही जपला पाहिजे. यापूर्वीही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य करत घाणेरडी भाषा वापरली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात इतक्या घाणेरड्या भाषेत कुणाला शिव्या दिल्या नाहीत. आणि याच प्रकरणावर बोलताना बाळासाहेबांचे नाव जोडणं योग्य नाही, असं वैशाली सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे. लोकप्रतिनिधींनी चांगल्या पद्धतीने काम करून लोकांपुढे आदर्श ठेवला पाहिले, असं म्हणत वैशाली सूर्यवंशी यांनी आपला आमदार भाऊ किशोर पाटील यांच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे.

प्रेम विवाहाला विरोध, प्रियकराच्या साथीने पोटच्या मुलीने दिली वडिलांची सुपारी, पण…

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *