मुंबई : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी नोंद केलेल्या गुन्ह्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी कालच पुणे पोलीस आयुक्तांना प्रश्न विचारले होते. पुणे पोलीस निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांची परेड कधी काढणार असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्याा सुषमा अंधारे यांनी देखील पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

निखिल वागळे यांच्या गाडीवरील हल्ल्या प्रकरणी गुन्हा नोंद करताना पुणे पोलिसांनी लावलेल्या कलमांवर सुषमा अंधारे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सुषमा अंधारे यांनी गेल्या वर्षी घडलेल्या घटनेचा आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याचा दाखला दिला आहे. उदय सामंत यांच्या गाडीची काच गेल्या वर्षी पुण्यातील कात्रज परिसरात शिवसैनिकांकडून फोडण्यात आली होती. त्या प्रकरणी पुणे पोलिसांनी कोणती कलमं लावली होती त्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली होती.

राज्यातली परिस्थिती चिंताजनक, सरकारचा वचक राहिला नाही, माजी केंद्रीय गृहमंत्र्यांनी गृहमंत्री फडणवीसांना सुनावलं

सुषमा अंधारे म्हणाल्या की, उदय सामंत यांच्या गाडीवर छोटासा ओरखडा उठला तेव्हा शिवसैनिकांवर भादवि ३०७, ३५३, ३२३ इतर ९ गुन्हे टाकले होते. दुसरीकडे निखिल वागळे यांची गाडी फोडून प्राणघातक हल्ला झाला. त्या प्रकरणात फक्त कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सगळे टेबल जामीन घेऊन पुरस्कार घेत आहेत, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
वागळेंवरील हल्ला ते पुणे पोलिसांची भूमिका, संजय राऊतांचा शिंदे फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले…

संजय राऊत काय म्हणाले होते?

निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम चौधरी यांच्यावर पुण्यात हल्ला झाला होता. त्यापूर्वी पुणे पोलीस आयुक्तपद स्वीकारणाऱ्यांनी गुंडांची परेड काढली होती. निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम चौधरी यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांचं काय झालं? पुणे पोलीस आयुक्तांनी गुंडांची परेड केली. वागळेंवर हल्ला करणाऱ्या गुंडांची परेड पोलीस आयुक्तांनी का काढली नाही. पुणे पोलीस आयुक्तांनी नाटकबाजी बंद करावी. वागळेंवर हल्ला करणाऱ्यांची देखील परेड पोलिसांनी काढली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News
दरम्यान, पुणे पोलिसांनी निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांसह निर्भय बनोच्या सभेच्या आयोजकांवर देखील गुन्हे दाखल केले आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *