[ad_1]

नवी दिल्ली: दिल्लीच्या नजफगड परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या डबल मर्डर केसने एकच गोंधळ माजला. परिसरातील एका सलूनमध्ये शुक्रवारी (९ फेब्रुवारी) काही अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला. या घटनेत दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेचं हादरवणारं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या घटनेच्या १४ सेकंदाच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, ३ जण या सलूनच्या आत शिरतात. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सलूनच्या एका कोपऱ्यात जमिनीवर बसलेला दिसून येतो. यादरम्यान पिवळ्या रंगाची हुडी घातलेला आरोपी त्याच्या जवळ जातो. तर काळ्या रंगाचं टीशर्ट घातलेला आणखी एक आरोपी हातात बंदूक घेतलेला दिसतो. तो सलूनमधील दुसऱ्या खोलीत जाण्याचा प्रयत्न करतो पण दार बंद असल्याने तो जाऊ शकत नाही. त्यानंतर तो बाहेर निघून जातो.

तर पिवळ्या रंगाडी हुडी घातलेला आरोपी हा त्या कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर बंदूक धरतो आणि काहीच क्षणात त्याच्यावर एकानंतर एक अनेक गोळ्या झाडतो आणि मग तिथून निघून जातो. गोळी झाडण्यापूर्वी ती व्यक्ती आरोपीला हात जोडून त्याला न मारण्याची विनंती करतानाही दिसत आहे.

यादरम्यान एका दुसऱ्या दारातून एक महिला बाहेर येते, तिच्यासमोरच आरोपी त्या व्यक्तीवर गोळ्या झाडतो. हे पाहून ती घाबरुन जाते आणि पुन्हा खोलीत जाते. बाजूला पडद्याआड एक महिला हातात लहान मूल घेऊन दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नजफगड पोलिस ठाण्याला या घटनेची माहिती पीसीआर कॉलवरुन देण्यात आली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. सोनू आणि आशिष अशी मृतकांची ओळख सांगण्यात आली आहे. दोघांचंही वय हे ३० च्या जवळपास असल्याची माहिती आहे.

उभ्या कंटेनरला स्विफ्ट कार धडकली, छप्पर उडालं, चारही बाजुने चक्काचूर, तिघांचा जागीच मृत्यू
या घटनेमागे आपआपसातील वैर हे कारण असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणाचा छडा लावण्यासाठी दिल्ली पोलिसांची तीन पथकं कामाला लागली आहे. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *