हिंगोली : महाराष्ट्रात जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यापासून एका आमदाराचं नाव सातत्यानं चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात कायम आहे. हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर सुरत गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबत नव्हते. एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या बहुमत चाचणी वेळी ते ठाकरेंना सोडून शिंदेंसोबत गेले. तेव्हापासून संतोष बांगर हे सातत्यानं अनेक गोष्टींमुळं वादात अडकत असतात. आता देखील संतोष बांगर यांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बांगर यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आई वडिलांनी मतदान कुणाला करावं यासंदर्भात प्रश्न विचारला आहे.

शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा चिमुकल्या विद्यार्थ्यासोबत धक्कादायक संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.हिंगोलीतील

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी मतदार विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने चर्चेत राहतात. त्यांनी हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात असलेल्या लाख गावांमध्ये शाळेमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक संवाद केला आहे. ते लाख गावांमध्ये गावातील विकासकांचे उद्घाटन व शाळेमध्ये विकास कामाच्या भूमिपूजन निमित्ताने कार्यक्रमाला गेलेले होते. यावेळी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत बोलताना त्यांनी धक्कादायक प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले.

परिस्थिती गंभीर, शिवसैनिक खंबीर; बाळासाहेबांची ‘कवचकुंडलं’ जोमात; उद्धव परिस्थिती पालटणार?

तुमच्या घरी जर पप्पा आणि आई म्हणत असतील की आपल्याला दुसरीकडे मतदान करायचं तर दोन दिवस जेवायचं नाही आणि आईने विचारलं का जेवायचे नाही ? तर त्यांना सांगायचं , आमदार संतोष बांगराला मतदान करा तेव्हाच आम्ही जेवतो, असा अजब सल्ला या चिमुकल्या विद्यार्थ्यांना आमदार संतोष बांगर यांनी दिला आहे. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सोमय्यांची मिमिक्री,गणपत गायकवाडांच्या वक्तव्याचा आधार,एकनाथ शिंदेंवर ईडीनं कारवाई करावी, संजय राऊतांची मागणी

कोण आहेत संतोष बांगर?

संतोष बांगर हे हिंगोलीच्या कळमनुरीमधून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराचा पराभव करुन विजयी झाले आहेत. २०१७ मध्ये त्यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. शिवसेनेतील फुटीवेळी सुरुवातीला ते ठाकरेंसोबत होते. ठाकरेंचं सरकार पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. शिवसैनिकांनी बांगर यांच्या वाहनावर हल्ला देखील केला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *