विशाखापट्टणम : सध्याच्या भारतीय संघातील खेळाडू जर कोणी डिवचलं तर शांत बसणारे नाहीत. या गोष्टीचा प्रत्यय आला ता श्रेयस अय्यरच्या रुपात. श्रेयस अय्यरने बेन स्टोक्सला त्याच्याच भाषेत चोख उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. श्रेयस अय्यरचा हा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.बेन स्टोक्स हा एक आक्रमक कर्णधार आहे आणि हे इंग्लंडच्या संघाला खेळ पाहून समजता येऊ शकते. बेन स्टोक्स जेव्हा सेलिब्रेशन करतो, तेव्हा त्याची शैली सर्वात वेगळीच असते. पण हे सेलिब्रेशन करत असताना तो समोरच्या व्यक्तीचा विचार करत नाही आणि समोरचा व्यक्ती काही वेळेला दुखावला जातो. त्यावेळी या गोष्टीचा बदला घेण्यासाठी प्रतिस्पर्धी खेळाडू वाटत पाहत असतो आणि हीच गोष्ट श्रेयस अय्यरबाबतही घडली. श्रेयस अय्यर हा सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात नाही. तो धावांसाठी झगडत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे सध्या तो धावा करण्यासाठी धडपडत आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरने एक मोठा फटका मारला होता, हा फटका आता सीमारेषे पार जाईल असे वाटत होते. त्यामुळे श्रेयस थोडाला सुखावला होता. पण बेन स्टोक्स यावेळी धावत त्या चेंडूच्या मागे गेला आणि धावत त्याने अप्रतिम झेल टिपला. हा झेल पकडल्यावर बेन स्टोक्सने जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळी बेन स्टोक्सने सेलिब्रेशन करताना आपल्या हाताचे एक बोट दाखवले. ही गोष्ट श्रेयस अय्यरला आवडली नाही. या सामन्याच्या दुसऱ्या डावात बेन स्टोक्स फलंदाजीला आला होता. बेन स्टोक्सवर इंग्लंडचा संघ अवलंबून होता. पण त्याचवेळी एक चोरटी धाव घेण्याच्या नादात तो धावचीत झाला. यावेळी श्रेयस अय्यरने थेट फेकीने स्टम्प उडवले. यावेळी बेन स्टोक्स आऊट आहे की नाही, ही गोष्ट तपासण्यासाठी रिप्ले पाहिला गेला आणि तिसऱ्या पंचांनी बेन स्टोक्स हा धावचीत झाल्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रेयसने जोरदार सेलिब्रेशन केले आणि बेन स्टोक्सने जसं त्याला बाद केल्यावरर हाताचे बोट दाखवले होते, तसेच दाखवले. श्रेयसच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *