पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात समरविक्रमा दुखापतग्रस्त असतानाही खंबीरपणे उभा राहिला. मात्र दुर्दैवाने त्याला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. समरविक्रमाने ५१ चेंडूत ४८ धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याने चार चौकारही मारले. या काळात त्याने कुसल मेडिंसला उत्कृष्ट साथ दिली, ज्याने पाकिस्तानी गोलंदाजांमध्ये आपले नाव कमावले.
पाकिस्तानने २५३ धावा केल्या
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यावरही पावसामुळे परिणाम झाला. त्यामुळे सामना ४२ षटकांचा करण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानी संघाने प्रथम फलंदाजी करत २५२ धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीक यांनी दमदार अर्धशतकी खेळी खेळली. रिझवानने ७३ चेंडूत ८६ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकारही मारले. तर शफिकने ६९ चेंडूत ५२ धावांचे योगदान दिले. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले. याशिवाय इफ्तिखार अहमदने ४० चेंडूत ४७ धावांची दमदार खेळी केली. पण श्रीलकेच्या कुसल मेंडिस आणि इतर फलंदाजांच्या जोरदार फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने हा सामना जिंकला आणि आशिया चषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले.