[ad_1]

मुंबई: ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद कौतुकास्पद आहे. चित्रपटसृष्टीतील दिग्गजांसह, सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी या चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं. नुकतंच अभिनेत्री सुकन्या मोने यांच्यासाठी आगळावेगळा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या बालपणीच्या मैत्रिणींनी एकत्र येऊन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

याविषयी सुकन्या मोने सांगतात ‘हा कार्यक्रम माझ्यासाठी अनपेक्षित होता. गेले अनेक दिवस सर्व मैत्रिणींना भेटायचंय असं बोलत होते, पण योग जुळून येत नव्हता. चित्रपटाला मिळालेलं यश, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या शुभेच्छा पाहून माझ्या बालमैत्रिणी भारावून गेल्या. आपणसुद्धा आपल्या मैत्रिणीचं कौतुक करायला हवं, म्हणून त्यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं होतं. ओटी भरणं, लेख लिहिणं, आवडीचे पदार्थ बनवून आणणं, माझ्या आधीच्या चित्रपटांतील गाण्यांचे ट्रॅक माझ्या स्वागतावेळी वाजवणं, असं नियोजन करण्यात आलं होतं. ज्या काकूंनी मला घडताना आणि घडवताना पाहिलं त्यांच्याकडून कौतुक होणं, यापेक्षा मोठी शाबासकी असूच शकत नाही. अशा प्रसंगांमुळे जाणवतं की, काम करत असताना केवळ पैसेच नाही तर जीवाभावाची, भरभरुन प्रेम करणारी माणसंदेखील कमावली आहेत’.

Tharla Tar Mag: प्रियाचं सीक्रेट बाहेर येणार की अर्जुन-सायलीचं? एका कॉलने घातला मोठा गोंधळ
मैत्रिणींनी सुकन्या कुलकर्णींच्या केलेल्या कोडकौतुकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सख्यांकडून मिळालेलं हे पाहून अभिनेत्री खूपच भारावून गेली होती. सुकन्या पुढे म्हणाल्या की, ‘मैत्रिणी रोजच्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून केवळ माझं कौतुक करण्यासाठी एकत्र आल्या. संपूर्ण कार्यक्रम, बालपणीच्या आठवणींना दिलेला उजळा, स्वत: तयार केलेल्या भेटवस्तू अशा कौतुकामुळे अब्जाधीश झाल्यासारखं वाटतं.’

विशाखाच्या आयुष्यात आलंय मोठं वादळ, देशमुखांच्या घरातील आणखी एक घटस्फोट अरुंधती थांबवू शकेल?
दरम्यान केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास प्रदर्शित झाल्यानंतर ४० दिवसात सिनेमाने ७५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘सैराट’नंतर सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा आहे. या सिनेमात सुकन्या यांच्यासह रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत.

बाईपण भारी देवा’ चित्रपटाला तोबा गर्दी, गर्दी पाहून व्यवस्थापकांची तारांबळ

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *