[ad_1]

पुणे: लोकसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. नैतिकता खुंटून टाकून सर्व पक्षांनी सत्तेसाठी केलेलं राजकारण राज्यातील मतदारांनी पाहिलं. विचित्र, अनैसर्गिक युत्या, आघाड्या जनतेनं बघितल्या. राज्यातील दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष फुटले. त्यानंतर होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मतदारराजा नेमका कोणाला कौल देणार ते पाहणं महत्त्वाचं असेल.

लोकसभा निवडणुकीत बारामतीत काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीचा कौल कोणाला मिळणार याबद्दल उत्सुकता आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बारामतीतून लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केली. लवकरच महायुतीचा उमेदवार जाहीर होईल. मी उमेदवार आहे असं समजून तुम्ही मतदान करा, असं आवाहन अजित पवारांनी केलं.
खरंच त्यांची शेवटची निवडणूक असेल का मला माहीत नाही! अजित पवारांची बारामतीत टोलेबाजी
आता निवडणूक जवळ आली आहे. काही जण येतील. आता माझी ही शेवटची निवडणूक आहे असं म्हणतील. त्यांची ही खरंच अखेरची निवडणूक आहे का ते मला माहीत नाही. पण तुम्ही भावनिक होऊ नका. तुम्हाला कळकळीची विनंती आहे, असं आवाहन अजित पवारांनी केलं. यावेळी अचानक एक कार्यकर्ता व्यासपीठावर आला. त्यानं अजित पवारांना वाकून नमस्कार केला. सुनेत्रा वहिनींना लोकसभेसाठी उमेदवारी द्या, असा आग्रह त्यानं धरला. कार्यकर्त्याला पाहून अजित पवारांनी नमस्कार केला आणि याला म्हणतात बारामती टोला लगावला. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
‘मुंबई-गुवाहाटी व्हाया सूरत’ नाटकात मी, तर ‘बारामती ते मंत्रालय’मध्ये…; सामंतांची फटकेबाजी
कामाचा वेग कायम ठेवण्यासाठी मला सहकार्य करा. आधी जसा पाठिंबा दिलात, तसाच पाठिंबा यापुढेही द्या. तर यापुढेही तुमची कामं होतील. अन्यथा मी तुमच्या कामांना बांधील नाही. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. स्पष्टवक्ता म्हणून मला महाराष्ट्र ओळखतो. मला बाकीचे उद्योग आहेत. तिथे मी इतकं काम केलं तर मी विमान, हेलिकॉप्टरनं फिरेन. मग मला सकाळी सातला उठून फिरण्याची पण गरज नाही. तुमच्या भागातील विकासाचं सातत्य टिकवायचं असेल, प्रगती सुधारणा व्हायची असेल तर आमच्या पाठिशी राहा, असं अजित पवार म्हणाले.

दीपक पडकर यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *