सोलापूर: माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे निर्भय बनो सभेसाठी रविवारी हेरिटेज लॉन्स या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. माध्यमांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदेंनी भारतरत्न पुरस्कारावर प्रतिक्रिया दिली. लालकृष्ण अडवाणी, स्वामीनाथन, पी व्ही नरसिंहराव, कर्पूरी ठाकूर, चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न जाहीर झाला आहे. सरकारच्या भारतरत्न पुरस्काराच्या घोषणेबाबत स्वागत करताना सुशीलकुमार शिंदें यांनी टोलेबाजी केली. सर्वांना एकदा एका लाइनमध्ये उभे करून भारतरत्न पुरस्कार द्या. भारतरत्न पुरस्काराची मागणी अनेक जण करत आहेत. बाळासाहेब ठाकरे, सावरकर, फुले दाम्पत्य यांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे. मात्र दिले जात नाही. ज्यांनी ज्यांनी मागणी केलीय त्या सर्वांना भारतरत्न पुरस्कार देऊन टाका, म्हणजे कुणी शिल्लक राहणार नाही असे वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी केले आहे.

राज्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली
महाराष्ट्र राज्यात गोळीबार, हत्याकांडासारख्या घटना घडल्या आहेत. त्यावर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी चिंता व्यक्त केली आहे. सरकारचा वचकच राहिला नाही. या सर्व घटनांना वेळीच नियंत्रित केले नाही तर याहीपेक्षा वाईट परिस्थिती निर्माण होईल. राज्यातील शांतता बिघडत चालली आहे, याची खबरदारी मुंबई पासून दिल्लीपर्यंत घेतली पाहिजे. राज्यातील पक्ष आणि विरोधी पक्ष हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना भाषा खालच्या तळावर जाऊन भाष्य करत आहेत. ही भाषा योग्य नव्हे. गल्ली बोळात चेंडू खेळताना जी भाषा वापरली जाते, त्या प्रकारची भाषा सत्ताधारी पक्षातील मंत्री वापरत आहेत, असे म्हणत सुशीलकुमार शिंदेंनी चिंता व्यक्त केली
शिर्डी आणि अहमदनगर लोकसभा : ठाकरेंच्या डोक्यात प्लॅन काय? राऊतांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे मैदानात

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार देवेंद्र फडणवीसांचे लाडके-आयुक्तांनी राजकारणातील गुंडाची परेड घ्यावी
निर्भय बनो सभेला जाताना पुण्यात ऍड असीम सरोदे, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यभर निर्भय बनो सभेला मोठा प्रतिसाद मिळत आहेत. पुणे पोलिसांच्या कारवाईवर त्यांनी संशय व्यक्त केला. आमच्या वाहनावर हल्ला झाला त्यावेळी पोलिस त्याठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित होते. हल्ला झाल्यानंतर आमची फिर्याद देखील योग्यप्रकारे लिहून घेतली नाही. राज्य मंत्रीमंडळातील मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर दगडफेक करणाऱ्या इसमावर भा.द.वि.३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला. आमच्या वाहनाच्या काचा फोडून आमचा जीव मारण्याचा प्रयत्न केला. तरी देखील आमची म्हणावी तशी फिर्याद घेतली नाही. देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अॅड असीम सरोदे यांनी केली आहे.

पोलीस विभातील काही लोकं हे भाजपच पाळीव झाले आहेत
अॅड असीम सरोदे यांनी सांगितले, आम्ही ज्या वेळी निर्भय सभेला निघालो त्यावेळी आमच्या वाहनाचा नंबर हल्लेखोरांना कोणी दिला? आमच्या वाहनावर ज्यावेळी हल्ला झाला होता त्यावेळी पोलीस बळ त्याठिकाणी उपस्थित होते. पोलीस कमिशनर आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी फोन करून फिर्याद देण्यास सांगितले. त्यावेळी आमच्या सोबत असलेल्या पोलिसांनी फिर्याद द्यावी आणि आमचं स्टेटमेंट घ्यावे. पोलीस विभागातील काही लोक हे भाजपचे पाळीव झाले आहेत. पुणे पोलिसांची कारवाई संशयास्पद आहे यात दुमत नाही, असे डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले. हल्ला करणाऱ्या गुंडांना आमच्या गाडीचा नंबर कुणी दिला, आमच्या गाडीला काळ्या काचा होत्या. कोणत्या रस्त्यांनी जाणार हे त्यांना कसं कळलं? पुणे पोलिसांनी म्हणावा तसा बंदोबस्त दिला नाही, असे आरोप असीम सरोदे आणि डॉ विश्वंभर चौधरी यांनी केले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *