[ad_1]

बेनोनी : पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया भारतावर भारी पडल्याचे पाहायला मिळाले. कारण ऑस्ट्रेलियाने 19U World Cup 2024 च्या फायनलमध्ये भारताला पराभूत केले. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २५३ धावा केल्या होत्या. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या २५४ धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात मिळाली नाही. आदर्श सिंगने एकाकी झुंज दिली खरी, पण त्याला संघाला सामना जिंकवून देता आला नाही. ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत ७९ धावांनी विजय मिळवत वर्ल्ड कप पटकावला.

ऑस्ट्रेलियाच्या २५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताला पहिला धक्का तिसऱ्याच षटकात अर्शीन कुलकर्णीच्या रुपात बसला. अर्शीनला यावेळी फक्त तीन धावाच करता आल्या. अर्शीन बाद झाल्यावर फलंदाजीला आला तो मुशीर खान. मैदानात आल्यावर मुशीरने आक्रमक पवित्रा धारण केला होता. मुशीरने यावेळी तीन चौकार लगावले खरे, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही आणि तो २२ धावांवर बाद झाला. मुशीर बाद झाल्यावर भारताला अजून दोन धक्के लवकरच बसले. कर्णधार उदय सहारन फलंदाजीला आला, पण त्याने मोठी चूक केली आणि तो फक्त ८ धावा करून बाद झाला. सचिन धस हा आतापर्यंतच्या वर्ल्ड कपमध्ये चांगल्या फॉर्मात होता. या वर्ल्ड कपमध्ये त्याने ३०० धावाही पूर्ण केल्या. पण यावेळी मात्र त्याला फक्त ९ धावांवर समाधान मानावे लागले. एकाबाजूने विकेट्स पडत असताना भारताचा सलामीवीर आदर्श सिंग हा एकटाच किल्ला लढवत होता. पण यावेळी अर्धशतकाजवळ आल्यावर तो बाद झाला. आदर्शने ७७ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४७ धावा केल्या. आदर्श बाद झाला आणि तिथेच भारताच्या हातून सामना निसटला. मुरुगन अभिषेकने त्यानंतर ४२ धावांची खेळी साकारली. पण यावेळी भारताला त्याला विजय मिळवून देता आला नाही..

त्यापूर्वी, ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने सुरुवातीला ऑस्ट्रेलियाला धक्का दिला खरा. पण त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाने धावांमध्ये सातत्य ठेवले. ऑस्ट्रेलियाच्या हरजस सिंगने यावेळी ३ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५५ धावा केल्या. भारताकडून यावेळी राज लिंबानी हा सर्वात यशस्वी ठरला. कारण राजने यावेळी ३८ षटकांत तीन बळी मिळवले. राजला यावेळी नमन तिवारीने दोन बळी मिळवत चांगली साथ दिली. पण तरीही ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करताना २५३ धावांचा डोंगर उभारता आला.

मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद पांड्याला, पुणेकरांच्या प्रतिक्रिया काय?

भारताच्या गोलंदाजांनी यावेळी चांगली कामगिरी केली खरी, पण फलंदाजांमुळे हा सामना भारताला गमवावा लागला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *