[ad_1]

मुंबई : टाटा समूहाची वीज कंपनी टाटा पॉवरने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा नफा दोन टक्क्यांनी वाढून १,०७६ कोटी झाला तर गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा नफा १,०५२ कोटी होता. कंपनीने सांगितले की या तिमाहीत त्यांचे एकूण उत्पन्न वाढून १४,८४१ कोटी रुपये झाले, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १४,३३९ कोटी रुपये होते.

कंपनीची आर्थिक स्थिती
चालू आर्थिक वर्षाच्या (एप्रिल-डिसेंबर २०२३) पहिल्या नऊ महिन्यांत कंपनीचा नफा वाढून ३,२३५ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत २,८७१ कोटी रुपये होता. कंपनीने सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत कंपनीचे उत्पन्न वाढून ४५,२८६ कोटी रुपये झाले आहे, जो या कालावधीतील कंपनीसाठीचा उच्चांक आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत टाटा पॉवरची अक्षय ऊर्जा विभागात ४,२७० मेगावॅटची कार्यक्षम क्षमता आहे, जी ६०३.१ कोटी युनिट हरित वीज निर्माण करते.

टाटा पॉवरचे सीईओंचे विधान
प्रवीर सिन्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD), टाटा पॉवर यांनी निवेदनात म्हटले आहे – आमचे मुख्य व्यवसाय चांगले प्रदर्शन करत आहेत आणि कंपनीला सलग १७ व्या तिमाहीत निव्वळ नफा मिळविण्यात मदत केली आहे.
एक चूक पडेल महागात! …तर बंद होईल तुमचे सेव्हिंग अकाउंट, खात्यातून सुरू ठेवा हे आवश्यक व्यवहार
शेअर्सची परिस्थिती

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये प्रचंड चढउतार झाले. या शेअरने ४१३ रुपयांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आणि नफा बुकिंगमुळे ३९२.१० रुपयांवर बंद झाला. याशिवाय दिवसाच्या ट्रेडिंग दरम्यान शेअर ४% किंवा त्याहून अधिक घसरला. मात्र, शेअर आणखी तेजीत येईल, असा ब्रोकरेजचा अंदाज असून ब्रोकरेज अँटिक ब्रोकिंगने टाटा पॉवरसाठी ४५० रुपये लक्ष्य किंमत निर्धारित केली, जी यापूर्वी ४२२ रुपये होती.
Stock Market: भारतीय शेअर बाजाराची धमाकेदार कामगिरी; चीनला बसला शॉक
(Disclaimer: येथे शेअरच्या कामगिरीबद्दल माहिती दिली आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी एक्सपर्टचा सल्ला घ्या. तुम्हाला झालेल्या नफा किंवा तोट्यास महाराष्ट्र टाइम्स जबाबदार राहणार नाही.)

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *