नागपूर: मराठा सर्वेक्षणाचे काम नुकतेच संपले. त्यानंतर राज्य शासनाने आता माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षणास जुंपण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन परीक्षांच्या कालावधीमध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १२ ते १६ फेब्रुवारीदरम्यान हे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
यांना मोठं मी केलं, याचा राजकीय बाप मी; रामदास कदम यांची संजय कदम यांच्यावर जहरी टीका
अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या विषयांचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाणार आहे. तालुकास्तरावर या प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक शाळेतील ६ ते ८ या वर्गांना शिकविणाऱ्या आणि ज्यांचे प्रशिक्षण झाले नाही अशा शिक्षकांना या टप्प्यामध्ये प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. त्यासाठीचे आदेश शिक्षण विभागाने संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत. मराठी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजीसहित विविध माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.

आमदार बांगरांनी राम मंदिराच्या प्रतिकृतीची सोन्याची अंगठी, बाळासाहेब आणि एकनाथ शिंदेंच्या प्रतिमेचं लॉकेट बनवलं

नागपूर महापालिकेच्या शिक्षण विभागानेही शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, शहराचे पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण चार विभाग पाडण्यात आले आहे. १२ ते १६ फेब्रुवारी या तारखांदरम्यान हे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. पूर्व विभागाचे प्रशिक्षण हिवरीनगर येथील जिंगल बेल्स हायस्कूल येथे, पश्चिम विभागाचे प्रशिक्षण धंतोली येथील सुळे हायस्कूल येथे, उत्तर विभागाचे प्रशिक्षण पाचपावली येथील एससीएस हायस्कूल येथे तर दक्षिण विभागाचे प्रशिक्षण क्रीडा चौकातील न्यू हॉरिझॉन हायस्कूल येथे होणार असल्याचे शिक्षण विभागाने कळविले आहे. दरम्यान, काही शिक्षकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

अभिषेक खुले यांच्याविषयी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *