[ad_1]

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: ठाणे लोकसभा मतदार संघात उमेदवार शिवसेनेचा, की भाजपचा यावरून रस्सीखेच सुरू असताना, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मात्र, ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळेल, असा दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात ठाणे मतदार संघाच्या उमेदवारीवरून चढाओढ सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाणे लोकसभा मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबिर नुकतेच ऐरोलीमध्ये पार पडले. त्यावेळी केसरकर यांनी हा दावा केला आहे. यावेळी केसरकर यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेली विकासकामे, शिंदेंच्या कार्यपद्धतीची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून मोदींचे हात बळकट करावे, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. तसेच ठाणे लोकसभा मतदार संघाविषयी बोलत असताना, केसरकर यांनी उमेदवारी निश्चितीबाबत शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू असून, या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा करत आपलाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला.

शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजवर केंद्र सरकारकडून सर्वाधिक निधी मिळवला आहे. राज्यात शिवसेनेची ताकद वाढली असून, लोकसभेत मुख्यमंत्री शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचे आवाहन केले.

ठाण्यात आमच्या खऱ्या शिवसेनेचा विजय, बाकी फुटलेला गट भाजपची धुणी-भांडी करतोय : संजय राऊत

‘हलगर्जी केल्यास पदे विसरा’

शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी ठाणे लोकसभा हा मुळापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी ज्याला उमेदवारी देतील त्याला आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, असे सांगत कार्यकर्त्यांनी हालगर्जी केल्यास त्यांना पदावरून पायउतार करण्यात येईल, असा सज्जड दमही दिला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *