[ad_1]

मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणूक धोक्याची आणि अस्थिर आहे, परंतु गुंतवणुकीच्या या क्षेत्राने लोकांचे नशीब बदलले आहे. यापैकी काही लोक दीर्घकाळात श्रीमंत झाले तर काही शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फारच कमी कालावधीत मल्टीबॅगर ठरले आहेत. असाच एक स्टॉक म्हणजे SG फिनसर्व कंपनीचा आहे ज्यामध्ये एक लाखाची गुंतवणूक करणारे अवघ्या चार वर्षातच करोडपती झाले आहेत.शेअरची किंमत काय
१९९४ मध्ये सुरू झालेल्या SG फिनसर्व लिमिटेड कंपनी ब्रोकिंग, वितरक, गुंतवणूक यासह फंड व्यवस्थापन, गुंतवणूक बँकिंग आणि विमा सेवा प्रदान करते. अवघ्या चार वर्षांच्या व्यवसायात शेअरने दोन रुपयांवरून ४३० रुपयांपर्यंत उडी घेतली असून २७ मार्च २०२० रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त २.८० रुपये होती, जी मंगळवारी शेअर बाजारातील व्यवहाराच्या शेवटी ४३१.८० रुपयांवर बंद झाली.
SRM Contrators: बाजारात एंट्री घेताच शेअर अप्पर सर्किटला, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी केली कमाई
एक लाखाचे झाले दीड कोटी
SG फिनसर्व लिमिटेडचे बाजार भांडवल २,२६० कोटी रुपये असून दोन रुपये ते ४३० रुपयांपर्यंत प्रवास करणाऱ्या या शेअरने या चार वर्षांत गुंतवणूकदारांना सुमारे १६०,००० टक्के इतका मजबूत परतावा दिला आहे. अशा प्रकारे एखाद्या गुंतवणूकदाराने एसजी फिनसर्व्ह शेअरमध्ये चार वर्षांपूर्वी २.८० रुपयांच्या किमतीत एक लाख रुपये गुंतवले असतील आणि आतापर्यंत स्टॉक होल्ड केले असतील तर या काळात त्यांना सुमारे १.५ कोटी रुपयांचा परतावा मिळाला असेल.
आजोबांची पुण्याई अन् नातवाला लागली लॉटरी, झटक्यात झाला लखपती; कसं ते वाचाच
स्टॉकची भन्नाट कामगिरी
एसजी फिनसर्व्हच्या कामगिरीवर नजर टाकायचे झाले तर शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत मल्टीबॅगर परतावा दिला आहे, तर गेल्या पाच वर्षांत शेअरच्या किमतीत ४२८.८५ रुपयांची वाढ झाली आणि गुंतवणूकदारांना १४,५३७ टक्के परतावा मिळाला आहे. कंपनीच्या स्टॉकचा उच्चांक ७४८ रुपये, तर नीचांकी पातळी ३८४.९५ रुपये आहे.
स्वस्तातील शेअरवर गुंतवणूकदार फिदा, खरेदीसाठी झुंबड; अंबानींचं आहे थेट कनेक्शन, तुमचा विचार काय?
वर्षभरात शेअर रॉकेटच्या वेगाने सुस्साट
मार्च २०२० मध्ये एसजी फिनसर्व शेअरची किंमत २.८० रुपये होती, तर पुढच्या एका वर्षात संथ गतीने वाढली आणि ऑगस्ट २०२१ पर्यंत सुमारे २-५ रुपयेपर्यंत वाढली. त्यानंतर ३१ डिसेंबरला वर्षाच्या अखेरीस या शेअर तेजीच्या लाटेवर स्वार झाला आणि ३० रुपयांवर व्यवहार सुरू झाल्यानंतर एसजी फिनसर्व्ह शेअरने मागे वळून पाहिले नाही आणि १३ जानेवारी २०२३ रोजी एका शेअरची किंमत रॉकेटच्या वेगाने वाढून ५६०.९० रुपयांपर्यंत वधारले. २६ मे २०२३ रोजी ७०० रुपयांची पातळीही ओलांडली मात्र नंतर शेअरचा वेग मंदावला आणि २ एप्रिल २०२४ रोजी ४३१.८० रुपयांवर स्थिरावला.

Read Latest Business News

(Disclaimer: शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *