वृत्तसंस्था, लखनौ:‘महाभारत काळात युद्ध होण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाकडे फक्त पाच गावे मागितली होती. हिंदू समाज फक्त अयोध्या, काशी, मथुरा या तीन क्षेत्रांसाठी आग्रही आहे,’ अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कृष्णजन्मभूमी व काशी विश्वेश्वर मंदिर समुहाबाबत आग्रह धरला आहे.

काशी आणि मथुरेत सध्या सुरू असलेल्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जाहीरपणे प्रथमच भाष्य करणारे योगी आदित्यनाथ, हे भारतीय जनता पक्षाचे पहिले महत्त्वाचे नेते ठरले आहेत.

योगी म्हणाले, ‘हिंदूंची श्रद्धास्थाने असलेली, प्रमुख दैवतांची तीर्थक्षेत्रे समाज मागत आहे. त्यांनी या प्रसंगी रामधारी सिंह दिनकर यांची कविता उधृत केली. देवतांनी अवतार घेतलेली ही ठिकाणे श्रद्धास्थाने आहेत. अयोध्येत दीर्घ काळ अन्याय झाला. प्रभू श्रीरामाला हक्काची जागा मिळाली नाही. तेथे नुकताच प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. जगभरात उत्साहाचे वातावरण तयार झाले. ‘मंदिर वही बनायेंगे’ची घोषणा आम्ही प्रत्यक्षात आणली. अन्य वादग्रस्त ठिकाणांबाबत समाज आग्रही नाही, हेही लक्षात घ्यायला हवे.’ योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या अर्थसंकल्पावेळी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केलेल्या भाषणाचाही संदर्भ देत, अयोध्येतील भव्य मंदिरानंतर राज्य विकासाच्या दिशेने वेगाने जात असल्याचे नमूद केले.

अयोध्येत दीर्घ काळ अन्याय झाला. प्रभू श्रीरामाला हक्काची जागा मिळाली नाही. हिंदू समाज फक्त अयोध्या, काशी, मथुरा या तीन क्षेत्रांसाठी आग्रही आहे.

– योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *