म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: गावाकडे गेल्याचे सांगून सदाशिव कडूबा चौथमल (वय ५०, रा. ह. मु. वाळूज परिसर) घराबाहेर पडले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चौथमल हे घरी न आल्याने त्यांच्या मुलाने त्यांना फोन केला. त्या वेळी तासाभरात येतो असे सदाशिव यांनी सांगितले. मात्र, घरी न जाता चौथमल यांनी छावणी रेल्वे उड्डाणपुलाखाली धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली.

शनिवारी (१० फेब्रुवारी) रोजी छावणी हद्दीतील रेल्वे रूळाजवळ पहाटे एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी चौकशी केली असता, तो मृतदेह सदाशिव चौथमल यांचा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी चौथमल यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली

सदाशिव चौथमल कन्नड येथील नाचनवेल येथील रहिवासी आहेत. वाळूज परिसरात कामानिमित्त त्यांचे वास्तव्य आहे. शुक्रवारी दुपारी पैशांच्या कामासाठी ते गावाकडे जात असल्याचे सांगून निघाले. त्यानंतर रात्री आठ वाजून गेल्यावरही ते घरी न आल्याने त्यांच्या मुलाने त्यांना फोन केला. सदाशिव चौथमल यांनी मुलाचा फोन घेऊन तासाभरात घरी येत आहे, असे सांगितले. मात्र, त्यानंतर घरी न जाता त्यांनी आत्महत्या केली.

या घटनेची नोंद छावणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास जमादार संगीता दराडे या करित आहेत.

परळीत कडकडीत बंद; महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासात दिरंगाई, पोलिसांविरोधात व्यापारी एकवटले

मोबाइलमुळे ओळख पटली

छावणी उड्डाणपुलाजवळ रेल्वे समोर उडी घेऊन एकाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली; तसेच तेथील परिसराची पाहणी केली. त्या वेळी त्यांना चौथमल यांचा मोबाइल सापडला. त्यानंतर त्यांची ओळख पटली. त्या मोबाइलवरूनच चौथमल यांच्या कुटुंबीयांना आत्महत्येच्या घटनेची माहिती देण्यात आली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *