[ad_1]

दक्षिण आफ्रिका: भारतीय संघ १९ वर्षाखालील विश्वचषक २०२४ चे विजेतेपद मिळवण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला त्यांच्याच मैदानावर एका रोमांचक सामन्यात पराभूत केले. या विजयासह भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. रविवारी होणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीत त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ज्युनियर क्रिकेटच्या महाकुंभाचा दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात झाला ज्यामध्ये ऑसी संघाने विजय मिळवला आहे. दुसरीकडे टीम इंडिया सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या तयारीत आहे. पाहूया कोण आहेत हे ५ भारतीय खेळाडू, जे जेतेपदाच्या लढतीत भारतासाठी सर्वात मोठे मॅचविनर ठरू शकतात.

उदय सहारण

उदय सहारण विश्वचषकाच्या या सामन्यात शानदार कामगिरी करत आहे. उपांत्या फेरीत भारताचे आघाडीचे ४ फलंदाज ३२ धावांत ऑलआऊट झाले तेव्हा सचिन धससोबत त्याने १७१ धावांची भागीदारी करून भारताला विजयापर्यंत नेले. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्या नावावर ३८९ धावा आहेत ज्यात एक शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचे कव्हर ड्राइव्ह शॉट्स अप्रतिम आहेत. कर्णधाराची बॅट एकदा तळपली की समोर संघ कोणता आहे, याने काहीच फरक पडत नाही.

मुशीर खान

मुशीर खान हा सरफराज खानचा भाऊ आहे, ज्याचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला होता. 360 डिग्री शॉट्स खेळणे हा मुशीरचा यूएसपी आहे. तो आपल्या उत्कृष्ट शॉट्सद्वारे विरोधी संघावर चांगलाच भारी पडतो. कोणत्याही स्थितीत मोठे फटके मारण्यास सक्षम आहे. उपांत्य फेरीत तो अपयशी ठरला असला तरी तो अप्रतिम फॉर्मात आहे. त्याने ६ सामन्यात ३३६ धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेट १०० पेक्षा जास्त आहे, या टूर्नामेंटमध्ये त्याच्या नावे २ शतके आणि एक शतक आहे. त्याची तुलना सूर्यकुमार यादवच्या शॉट्ससोबत केली जात आहे.


सचिन धस

सचिन धसकडे वेगळ्या झोनचा फलंदाज म्हणून पाहिले जाते. त्याचे नाव त्याच्या पालकांनी महान सचिन तेंडुलकरच्या नावावर ठेवले होते आणि संघात १० नंबरची जर्सी तो घालतो. आत्तापर्यंत आपल्या चमकदार कामगिरीने त्याने जर्सी आणि सचिनच्या नावाप्रमाणेच चमकदार कामगिरी केली आहे. तो स्पर्धेतील तिसरा सर्वोत्कृष्ट स्कोअरर आहे. त्याच्या नावावर २९४ धावा आहेत ज्यात एक शतक आणि एक अर्धशतक आहे. उपांत्य फेरीत त्याने निर्णायक वेळी ९६ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली.

मुलाला सचिन बनवण्यासाठी आई-वडीलांची धडपड; बीडच्या सुपुत्राने भारतीय संघातून गाठला विश्वचषकापर्यंतचा टप्पा

राज लिंबानी

या टूर्नामेंटमध्ये राज लिंबानी हे नाव भारतीय संघासाठी शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आले आहे. उपांत्य फेरीत या उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी करत ३ विकेट घेतले. आतापर्यंत त्याने ८ विकेट्स घेतल्या आहेत आणि बॅटनेही तो चमकदार कामगिरी करण्यात माहीर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने टीम इंडियासाठई मोक्याच्या क्षणी १३ धावांची नाबाद खेळी केली, ज्यात त्याच्या एका षटकाराने सामन्याचा रोख भारताच्या बाजूने वळवला.

सौम्य पांडे

अक्षर पटेल-रवींद्र जडेजाप्रमाणेच सौम्य पांडे हा ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहे. त्याने विश्वचषकात १७ विकेट घेतल्या असून सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे दमदार चेंडू आतापर्यंत विरोधी फलंदाज ओळखण्यात कमी पडले आहेत. सौम्य पांडेला वेगवान गोलंदाजांना अनुकूल दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर अशी दमदार गोलंदाजी करताना पाहणे कमाल आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *