[ad_1]

नवी दिल्ली : मेटाचे सह-संस्थापक मार्क झुकरबर्ग आता जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अलीकडेच मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांना मागे टाकले. अशाप्रकारे श्रीमंतांमध्ये झुकरबर्ग यांच्या पुढे फक्त तीनच व्यक्ती आहेत – एलन मस्क, बर्नार्ड अर्नॉल्ट आणि जेफ बेझोस तर, बिल गेट्स पाचव्या क्रमांकावर घसरले आहेत. मात्र, फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटाने आपल्या वार्षिक अहवालात एक खळबळजनक गोष्ट उघड केली. संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा मृत्यू होण्याचा धोका असल्याचे, मेटाने आपल्या अहवालात म्हटले.

RBI MPC Meeting: व्याजाचे दर वाढणार की जैसे थे राहणार? घ्या जाणून काय आहे तज्ज्ञांचा अंदाज
हैराण करणारी गोष्ट असली तरी खरं आहे. मार्क झुकरबर्ग यांना पाहिल्यावर त्यांचा हसरा चेहरा समोर येईल, पण झुकरबर्ग धोकादायक जीवनशैली फॉलो करतात असं त्यांच्या कंपनीने स्वतः उघड केले. मेटाने आपल्या वार्षिक अहवालात झुकरबर्गच्या जीवावरील धोका व्यक्त केला आहे. मार्क झुकरबर्ग धोकादायक जीवनशैली अवलंब करतात, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे जे त्यांच्यासाठी जीवघेणे ठरू शकते. झुकरबर्ग यांना बॉक्सिगं, जुजुत्सु फायटिंगची आवड आहे. अहवालात असा उल्लेख आल्यानंतर सगळेच चक्रावून गेले आहेत.

आरबीआयचे निर्बंध,शेअर्समध्ये सातत्यानं घसरण; पेटीएमसाठी मोठी अपडेट, बड्या कंपनीकडून २४४ कोटींची गुंतवणूक
मेटाच्या अहवालात काय म्हटले?
मेटाच्या अहवालानुसार झुकरबर्ग आणि व्यवस्थापनातील काही इतर सदस्य कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स, एक्सट्रीम स्पोर्ट्स आणि मनोरंजक (रिक्रिएशन) विमानचालन यासह उच्च-जोखीम क्रियाकलापांचा सराव करतात ज्यामध्ये मृत्यू आणि इजा होण्याचा धोका खूप जास्त असतो. याशिवाय दिग्गज सोशल मीडिया कंपनीने पुढे म्हटले की झुकरबर्ग यांना मिक्स्ड मार्शल आर्ट्स, हायड्रोफॉइलिंग आणि क्रॉसफिटची देखील खूप आवड असून पायलटचा परवाना मिळवण्यासाठी ते प्रशिक्षण घेत आहेत. १७० अब्ज डॉलरच्या एकूण नेटवर्थसह झुकरबर्ग जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती बनले असताना अब्जाधीशाबाबत नवीन अपडेट समोर आली आहे.

TCS कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढलं, आता प्रमोशन हवं असेल तर… पगारवाढ, पदोन्नतीसाठी नवे नियम
मेटाच्या या पावलानंतर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून आली आणि गेली शुक्रवारी, मेटाच्या स्टॉक लक्षणीय वधारले ज्यामुळे कंपनीने केवळ एका दिवसात २०० अब्ज डॉलर्स जोडले. तसेच ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कोणत्याही कंपनीने एका दिवसात केलेले हे सर्वाधिक मूल्य असून मार्क झुकरबर्गबाबत देण्यात आलेल्या माहितीने कंपनीच्या शेअरमध्ये तेजी राहिली असं नाही. तर प्रत्यक्षात कंपनीने पहिल्यांदाच लाभांश जाहीर केला असून कंपनी सर्व भागधारकांना लाभांश देईल. या घोषणेनंतर मेटा स्टॉक २० टक्क्यांनी उसळला.

Read Latest Business News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *