[ad_1]

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी पीएमएलए कायदा सांगतो की गुन्हेगारी स्वरुपाचा पैसा कुणी स्वीकारला असेल, तर त्या मनी लाँडरिंग प्रकरणात संबंधितांना अटक व्हायला हवी, अशी त्या कायद्यातील स्पष्ट व्याख्या आहे. भाजपचे आमदार सध्या तुरुंगात आहेत, त्यांनी गुन्हा केलेला असून सध्या ते तुरुंगात आहेत. त्यांचं वक्तव्य आहे की माझे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे पडलेले आहेत, मी दिलेले आहेत असं ते म्हणालेत. गणपत गायकवाड यांच्या वक्तव्याचा आधार घेत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

संजय राऊत पुढे म्हणाले की, आमच्या माहितीनुसार आणि त्या भागातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हा शंभर कोटींच्या वर आहे. गेल्या १० वर्षात ही रक्कम त्यांच्याकडे पोहोचलेली आहे. प्रश्न आहे का? तर त्याचं उत्तर मिळालं पाहिजे. जर हा गुन्हेगारी स्वरुपातून मिळालेला पैसा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असेल, त्यांनी स्वीकारला असेल तर त्यांच्या विरोधात पीएमएलए कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

पीएमएलए कायद्याला पुरावा लागत नाही, आम्हाला सर्वांना वक्तव्याच्या आधारे अटका झालेल्या आहेत. एखाद्या व्यक्तीच्या वक्तव्यावर दुसऱ्या व्यक्तीला अटक केली जाते. यातून कायद्याचा गैरवापर होतो. भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड सागंतात की कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदेंना दिलेत तर हाच पुरावा आहे. मग, ईडी कुठंय, सीबीआय कुठंय, आर्थिक गुन्हे शाखा कुठे आहे, गृह मंत्रालय काय करतंय, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वर्षावर जाऊन एकनाथ शिंदे यांना हिशोब मागावा, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी राऊत यांनी सोमय्यांची मिमिक्री केली.

श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्राचे बाळराजे आहेत. श्रीकात शिंदे यांची ओळख हाडवैद्य अशी होती. त्यांना उद्धव ठाकरे यांनी खासदार केलं. सध्या ते मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत, त्यामुळं त्यांचा वाढदिवस राज्यभरात साजरा केला जात आहे. पुण्यातील गुंड हेमंत दाभेकर यानं श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती, त्यावरुन देखील संजय राऊत यांनी टीका केली.
राहुल नार्वेकरांची पक्षांतर बंदी कायदा चिकित्सा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती, विरोधकांकडून टीकेची झोड
भाजप आमदार पोलीस स्टेशनमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या खास माणसावर गोळीबार करतात. एका उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र एका गुंडाला भेटतात, विचारांचं आदान प्रदान करतात. काल बाळराजे यांच्या वाढदिवसाला गुंडांची फौज होती, असं संजय राऊत म्हणाले. गुंडांचं संघटन करण्यासाठी माजी पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप संजय राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना या राज्यात कायद्याचं राज्य यावं, असं वाटत असेल तर ते गृहमंत्री म्हणून काम करतील. एकनाथ शिंदे यांच्या दडपणाखाली ते आहेत का असा सवाल राऊत यांनी केला.
पोलिसांसमोरच सत्ताधाऱ्यांचे गँगवॉर, फडणवीसांनी राजीनामा द्यावा, गोळीबार प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक
महाराष्ट्रातील एका खासदाराचा भयंकर व्हिडिओ आलेला आहे. शिंदे गटाचे ते खासदार आहेत, ते परदेशात गेले होते. ते खासदार परदेशात का जातात ते समोर येईल. शिंदे गटाचे खरं चरित्र लोकांसमोर येईल आणि नरेंद्र मोदी आणि अमित शाह जाहीर करतील आमचा यांच्याशी संबंध नाही, वेट अँड वॉच, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांच्या संदर्भातील वक्तव्यावरुन संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील समाचार घेतला.
निवडणुकांसाठी गुंडांना जामिनावर सोडलं; रामावर हक्क सांगता, तर कायद्याचं राज्य कधी? राऊतांचे फडणवीसांना सवाल
Read Latest Maharashtra News And Marathi News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *